Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रशिवजयंती उत्सव २०२५ निमित्त यशसिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन, शाक्य सेवा...

शिवजयंती उत्सव २०२५ निमित्त यशसिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन, शाक्य सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने “रयतेचे राजे शिवछत्रपती” यांना सलामी मानवंदना..

सोलापूर मुकनायक वृत्तसेवा

सोलापूर दि. १९: शिवजयंती उत्सव २०२५ “रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज” जयंतीनिमित्त सोलापूर चौकातील अश्वारूढ पुतळ्यास सलामी मानवंदना देण्यात आली. “यशसिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य.शाखा सोलापूर” (महार रेजिमेंट माजी सैनिकांची संघटना) आणि “शाक्य सेवा संघ” (पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची संघटना) राज्य उपाध्यक्ष, सेवानिवृत्त मेजर आयु. शिवपुत्र घटकांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज सलामी व मानवंदना समर्पित करणेत आली. मानवंदना, सलामी समर्पित करणेसाठी आजी – माजी सैनिकांची उपस्थिती लक्षणिय होती. या सलामी सोहळ्यास आयु. रामचंद्र माशाळे, आयु. विष्णू वाघमारे, आयु. सिद्धार्थ गायकवाड , आयु. सुरेश गेजगे, आयु. भाऊसाहेब वंजारे, आयु. सूर्यकांत गजघाटे, आयु. कुंदन कांबळे,आयु. प्रकाश गटकांबळे, आयु.भाऊसाहेब वंजारे अध्यक्ष, शाक्य सेवा संघ सोलापूर, आयु. अंगद मुके, आयु . अशोककुमार दिलपाक, आयु . नागेश गायकवाड, आयु . श्रीमंत गायकवाड,आयु. यलदास वामने, आयु. शांताराम वाघमारे, आयु. शेखर वाघमारे, आयु. किसन सुरवसे या बहुसंख्य आजी माजी सैनिक, अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये रयतेच्या राजाला सलामी मानवंदना समर्पित करणेत आली.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments