HomeUncategorizedपत्रकारानी समाजातील अन्याय आत्याचारा विरोधात वास्तव लिखाण करणे ही खरी पत्रकारिता :...
पत्रकारानी समाजातील अन्याय आत्याचारा विरोधात वास्तव लिखाण करणे ही खरी पत्रकारिता : माजी मंत्री चव्हाण
- धाराशिव (मारुती बनसोडे ब्यूरो चीफ धाराशिव) पत्रकारानी अन्याय आत्याचाराच्या विरोधात व समाजातील गोरगरीब जनतेस न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखनीचा वापर करुन वास्तव प्रश्न मांडून न्याय देण्याचे कार्य आपल्या पत्रकारितेतून करावे असे प्रतिपादन माजी मंत्री मधूकराव चव्हाण यांनी तुळजापूर येथे आयोजित पत्रकारांच्या सत्कार समारंभात बोलताना केले- कार्यक्रमांच्या सुरुवातीस कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण कार्यक्रमाचे संयोजक अमर मगर यांच्या हस्ते महाराष्ट्राची कुलस्वामीनि आई तुळजाभवानी मातेच्या व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व त्यानंतर तुळजापूर तालुक्यातील शहर पत्रकार संघ ईटकळ ग्रामीण पत्रकार संघ व नळदुर्ग शहर पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तामलवाडी, अणदूर पत्रकार संघ आदी पत्रकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मूकनायक चे जिल्हा प्रतिनिधी मारुती बनसोडे यांचा ही सत्कार करण्यात आला.पुढे बोलताना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले की, या तालुक्यातील पत्रकारांनी येथील जनतेने तिसऱ्या पिढीपर्यंत मला साथ देवून महाराष्ट्राच्या राजकारणात मला पाच वेळा विधानसभेत पाठवून या तालुक्याच्या व जिल्हयातील जनतेची सेवा करण्याची संधी दिली मी वयाच्या २२ व्या वर्षी राजकारणात आलो आणि तुळजापूर पंचायत समितीचे सभापती ते महाराष्ट्राच्या मंत्रीमंडाळत मला काम करण्याची संधी आपण दिलात त्याममध्ये पत्रकारांचा सिंहाचा वाटा आहे . सध्या महाराष्ट्रात आराजकता माजली असून बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील तरुण सरपंच संतोष देशमुख याची हत्या करण्यात आली तर परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू ह्या दोन्ही घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत .यातील आरोपीना कठोर शिक्षा झाली पाहिजे या कामी सुद्धा पत्रकारांनी या प्रकरणी वास्तव लिखान करून या दोन्ही युवकाना न्याय मिळून देण्यासाठी कार्य करावे असे माजी मंत्री मधूकराव चव्हाण म्हणाले. या वेळी बीड आणि परभणी येथील झालेल्या हत्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्विकारुन संबधित मंत्र्यानी राजीनामा द्यावा असा ठराव ही सहमत करण्यात आला.
- या प्रसंगी जि .प .चे माजी अर्थ व बांधकाम सभापती मुंकुद डोंगरे प .स .चे माजी सभापती शिवाजी गायकवाड,नवाज काझी सह परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकमाचे प्रास्ताविक संयोजक अमर मगर यांनी केले तर सुत्रसंचलन आणि आभार राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक व पत्रकार भैरवनाथ कानडे यानी मानले