Thursday, February 26, 2026
Homeकोल्हापूरबाबासाहेबांच्या अस्थी केवळ चैत्यभुमी व दिक्षाभुमीतच अफवांवर विश्वास ठेवू नका...- डॉ. भीमराव...

बाबासाहेबांच्या अस्थी केवळ चैत्यभुमी व दिक्षाभुमीतच अफवांवर विश्वास ठेवू नका…- डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी प्रसिद्धीपत्रका मार्फत, व्हिडीओद्वारे केला महत्वाचा खुलासा…

मुकनायक वार्ताहर तानाजी राजवर्धन

दि.१: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी या दादर चैत्यभूमी व नागपुरच्या दिक्षाभुमी व्यतरिक्त कोठेही नाहीत. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये.असा खुलासा भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेबांचे नातु डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केला आहे. कोल्हापुर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील हुपरी याठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी असल्याच्या बातम्या प्रसिध्दीमाध्यमातुन तसेच समाजाच्या माध्यमातुन पसरविल्या जात आहेत हा अत्यंत खोडसाळ प्रकार असल्याचा खुलासा डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी आपल्या *०३/१२/२०२३* च्या प्रसिध्दी पत्रकातुन केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी *०७ डिसेंबर १९५६* रोजी दादरच्या स्मशानभुमीत समता सैनिक दल तसेच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. तसेच लाखो आंबेडकरी जनता यावेळी उपस्थित होती. मात्र प्रचंड बंदोबस्तातुन बाबासाहेबांच्या अस्थी अन्य कोणीही घेऊन जाणे अशक्य बाब आहे. या अस्थी केवळ दादर चैत्यभूमी व नागपुरच्या दिक्षाभुमी साठीच दिल्या असल्याने इतर अन्य ठिकाणी या अस्थी असल्याचा खोडसाळ प्रचार प्रसार करून जनतेची दिशाभुल करण्यात येत असुन या अफवांना कोणीही बळी पडु नये असे आवाहन डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments