कागल रिपोर्टर तानाजी राजवर्धन
दिनांक २६: यावर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा “राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार” जाहीर झाला असल्याचे ‘ईगल फौंडेशन सांगली’ यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त कस्टम ऑफिसर, समता सैनिक दलाचे
सैनिक आयु. मदन पवार (भाऊ) यांना
त्यांच्या सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची विशेष दखल घेवून ‘ईगल फौंडेशनचा सन २०२४’ चा अत्यंत प्रतिष्ठेचा “राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार” जाहीर करण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे. रविवार दि.०८ डिसेंबर २०२४ रोजी संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे (सांगली रोड) जि. कोल्हापूर येथे सकाळी ठिक १०:० वाजता आयोजित करण्यात येत असलेल्या एका खास सोहळ्यात मानपत्र व सन्मान चिन्ह बहाल करुन गौरविण्यात येणार असल्याचे ईगल फौंडेशन नें कळविले आहे…

