Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रशिवसेना शिंदे गटाला धक्का: नरेश मनेर यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (१९५६)...

शिवसेना शिंदे गटाला धक्का: नरेश मनेर यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (१९५६) मध्ये प्रवेश, खालापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ

रायगड: कुंभिवली विभागात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नरेश मनेर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (१९५६) मध्ये प्रवेश केला आहे. रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या विचारसरणीवर प्रभावित होऊन आणि कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड, रायगड जिल्हा अध्यक्ष अशोक गोतारणे व उपाध्यक्ष गोपीनाथ सोनावणे, सचिव राकेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मनेर यांनी हा निर्णय घेतला आहे.
नरेश मणेर यांच्या या प्रवेशामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कुंभिवली विभागातील प्रभावशाली आणि डॅशिंग व्यक्तिमत्व असलेल्या मनेर यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (१९५६) च्या खालापूर तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, ज्यामुळे या भागातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे वर्तवण्यात येत आहे. यावेळी या ठिकाणी रायगड जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथ सोनावणे, जिल्हा सचिव राकेश गायकवाड, खालापूर तालुका अध्यक्ष सुनील सोनावणे, जिल्हा युवक उपाध्यक्ष शिवाजी वाघमारे, दिपक गायकवाड, ⁠गणेश केदारी, नरेश जाधव, संतोष केदारी, शिवाजी राठोड, नितेश गायकवाड, गोविंद खंडागळे, सचिन मार्तंडे, जगदीश कांबळे, नागेश जाधव, अमर गायकवाड, राज गायकवाड, सुशांत गायकवाड, रोशन सोनावणे, अजय सोनावणे, ऋषिकेश मोर, प्रमोद मोरे, प्रकाश गायकवाड, संतोष गायकवाड, चंद्रकांत खंडागळे, साहिल गायकवाड, सक्षम ओव्हाळ, पीयूष ओव्हाळ, संकेत गायकवाड, दिपक कांबळे, अजय शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments