Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रनळगंगा धरणाचे ११ दरवाजे उघडल्याने मोताळा तालुक्यातील गावांमध्ये जनजीवन विस्कळीत

नळगंगा धरणाचे ११ दरवाजे उघडल्याने मोताळा तालुक्यातील गावांमध्ये जनजीवन विस्कळीत

(शफीक शेख, पिंपरी चिंचवड पत्रकार मूकनायक)

मोताळा, दि. १२ :- मोताळा तालुक्यात काल रात्रीपासुन फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे नळगंगा धरण १०० टक्के भरल्यामुळे एकाच वेळेस ११ दरवाजे उघडले. परिणामी आजुबाजुच्या गावांत प्रशासनाला जवळपासच्या गावांत भोरटेक, पिपंळपाटी, शेलापुर खुर्द तसेच घुस्सर या गावात अलर्ट जारी करावे लागले. तेथील लोकांनी आपल्या जीवनावश्यक गोष्टी घेऊन घराबाहेर पडले आहेत. सर्व गावांतील लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. आज विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या प्रमाणात भोरटेक, पिपंळपाटी, शेलापुर, घुस्सर या गावांत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु गावात पाणी घुसल्याने या गावातील नागरीकांना कुठल्याच प्रकारचा सण उत्सव साजरा करता येत नाही. प्रशासनाने या गावांतील नागरिकांची व्यवस्था करावी, अशी पूर्ण जनतेची मागणी प्रशासनाकडे आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments