विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात देशातच नव्हे तर जगभरात साजरी होत आहे अमरावती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा रिपब्लिकन सेनेचे अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडी एमआयएम पुरस्कृत उमेदवार –
आद. आनंदराज आंबेडकर तब्बल दीड तास रांगेत उभे राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले…!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जयंतीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता जिल्हाभरातील लाखो भीम अनुयायी अभिवादन करण्याकरिता येत असतात ! पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता एक किलोमीटर ची रांग भिम अनुयायांचे लागलेली असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभा निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी व्हीआयपी व्यक्ती प्रमाणे थेट पुतळ्याला जाऊन हारार्पण न करता आपल्या सर्व सामान्य भीम अनुयाई रांगेत उभे असल्याचे पाहून त्यांनी हे रांगेतच लागून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचे ठरविले. यावेळी अनेक भीम अनुयानी कार्यकर्ते यांनी त्यांना थेट पुतळ्याजवळ हारार्पण करण्याची विनंती केली मात्र आद. आनंदराज आंबेडकर साहेब यांनी भिम अनुयायी यांच्या सोबत रांगेत उभे राहून अभिवादन करू अस ठळक सांगितलं. व तब्बल दीड तास रांगेत उभे राहून पुतळ्याजवळ पोहोचले. त्यानंतर त्यांनी हारार्पण करून अभिवादन केले. . यावेळी पुत्र अमन आंबेडकर यांच्यासह उपस्थित होते…!!
नातू भीमाचा. वंशज आंबेडकरांचा रांगेत उभ राहून सर्वसामान्य माणसां प्रमाणेच दीड तास उभं राहून अभिवादन करतायत ! हे बघून माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याचं मन भरून आलं..

