Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्र*'बार्टी' संशोधकांच्या फेलोशिप करिता २३५ कोटींची गरज : अमोल वेटम*

*’बार्टी’ संशोधकांच्या फेलोशिप करिता २३५ कोटींची गरज : अमोल वेटम*

*७६१ विद्यार्थी दोन वर्ष फेलोशीप पासून वंचित, सामाजिक न्याय खाते उदासीन, विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच*

सांगली दि. ०५ : डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी यांच्या मार्फत ७६१ विद्यार्थ्यांचे फेलोशिप गेले दोन वर्ष थकीत आहे, याकरिता गेले ११० दिवसापासून पुणे येथील बार्टी कार्यालय समोर विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. फेलोशिप करिता लागणारे २३५ कोटी रुपये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अद्यापही मंजूर करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री यांच्याकडे हे खाते असून अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान होत आहे. उच्च शिक्षणापासून सरकार रोखत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग प्रधान सचिव सुमंत भांगे, बार्टी महासंचालक सुनील वारे, निबंधक इंदिरा आस्वार यांना तत्काळ हटवण्याची मागणी रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल तसेच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगास केली आहे.

सारथी तसेच महाज्योती या संस्थेमधील वर्ष २०२२ च्या विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे. बार्टीने देखील सन २०२२ च्या विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्ती देण्याबाबत अंमलबजावणी करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ अवार्ड लेटर देवून अधिछात्रवृत्ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, दि. १० जानेवारी रोजी होणारी चाळणी परीक्षा रद्द करावी, सरसकट फेलोशीप देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्याची आहे. राज्यभर सामाजिक न्याय विभाग, बार्टी यांच्या गलथान कारभाराचा निषेध होत आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments