Thursday, February 26, 2026
Homeपिंपरी-चिंचवडदेवेंद्र तायडें यांची राष्ट्रवादी काॅंग्रेस पिंपरी चिंचवड शहर कमिटीत "कार्याध्यक्ष" पदी जयंत...

देवेंद्र तायडें यांची राष्ट्रवादी काॅंग्रेस पिंपरी चिंचवड शहर कमिटीत “कार्याध्यक्ष” पदी जयंत पाटील यांनी केली नियूक्ती..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०३ डिसेंबर २०२३ वंचित मधे अध्यक्ष पदावर सतत पाच सहा वर्ष काम केलेले व पोट निवडनूक चिंचवड विधानसभा वेळी पक्षाच्या कामावर नाराज होत राष्ट्रवादी काॅंग्रेसची वाट धरली पण राष्ट्रवादी काॅंग्रेस मधे ही दूफळी निर्माण झाल्याने पदगृहणा पासून वंचित राहिलेले नेते आयु. इंजि. देवेंद्र तायडे यांनी अजित पवारांनसोबत न जाता शरद पवारांना साथ देत शरद पवांराच्या पक्षाची स्थानिक कार्यकर्त्यांना एकत्र करून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची कोअर कमीटी बनवून सर्वांना पदे वाटप करून घेतली व काल पर्यंत स्वताला या प्रक्रियेतून वंचित ठेवून बस काम करत राहीले अशा धडाडीच्या या नेत्याचा विचार पक्षाने घेतला अन आज त्यांना “कार्याध्यक्ष” या पदावर नियूक्त करण्यात आले.
यांच्या नियूक्ती वेळी त्यांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी अंदाजे पंन्नासचे वरती इतर पक्षातून राष्ट्रवादी शरद पवार गटात येवून काम करण्याची तयारी दाखवलेल्या नेत्यांची पक्षाच्या विविध पदावर व सेल वर जयंत पाटील यांच्या हस्ते पद नियूक्ती करण्यात आली. या वेळी पक्षाला माननारे व पवार साहेबांशी एकनिष्ठ असनारे नेते कार्यकर्ते हजारोंच्या संखेने उपस्थित होते.
यावेळी पक्षाचे नव नियूक्त कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे बोलले की मला आज माझ्या कामाची खरी पावती जयंत पाटलांनी पद नियूक्ती करून दिली. मी पदा साठी कधीच कोणाला बोललो नाही पण पक्ष आपल्या कामावर लक्ष ठेवून असतो अन अशाच एखाद्या कार्यक्रमाचे औचित्य साधून तूम्हा ही पावती मिळते जी तूम्ही कधीच विचारात देखील घेतलेली नसते. तेव्हा कोणत्याही संघटनेत काम करत असाल तर त्या संघटनेशी तूम्ही अगदीच एकनिष्ठ रहायला हवे कारण पक्ष श्रेष्ठी तूम्हाला पहात असते तूम्हाला तपासत असते.
असे बोलतांना त्यांनी आमदार रोहित पवारांनसोबत केलेले काम हे अविस्मरनिय होते. असे ही सांगीतले सोबत ते हे बोलायला विसरले नाहीत की पवार साहेबांची खरी झलक व हूशारी व कामाची स्टाईल व आलेले काम शेवटा पर्यत घेवून जाण्याचा साहेबांचा हातकंडा हा रोहित पवारांनी खरा आत्मसाद केलेला आहे. त्यामूळे या पूढे पिंपरी चिंचवडचे पूढील भाग्यविधाते हे रोहित पवारच असतील असे ते बोलले.
यावेळी पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments