मुकनायक प्रतिनिधी :-गणेश चव्हाण
कोल्हापूर रिपब्लिकन सेनेच्या वतीने सोमवारी दि २७ नोव्हेंबर रोजी सायं ५ , वाजता ऐतिहासिक बिंदू चौक येथे संविधान बचाव यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार असून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष बहुजन ह्दय सम्राट सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, दिक्षा भुमी ते चैत्य भुमी या मार्गावर रिपब्लिकन सेनेच्या वतीने संविधान बचाव यात्रा काढण्यात आली आहे,ही यात्रा सोमवारी दि २७ रोजी कोल्हापूर मध्ये दाखल होत असुन कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे,या यात्रेच्या निमित्ताने रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष बहुजन ह्दय सम्राट सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या सह , महाराष्ट्र प्रदेशची सर्व कार्यकारिणी उपस्थित राहणार आहे,या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पुरोगामी विचार धारा जोपासणाऱ्या पक्ष संघटनांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अर्जुन कांबळे, युवा जिल्हा अध्यक्ष अमोल कांबळे, कृष्णा दवणे जिल्हा महासचिव,सागर कुराडे जिल्हा महासचिव,बाबासो कामत जिल्हा निरिक्षक यांनी केले आहे,

