वरिष्ठ प्रतिनिधी मूकनायक लक्ष्मण रोकडे पिंपरी चिंचवड दि. २० नोव्हेंबर २०२३ माता रमाई आवास घरकुल योजना बालाजीनगर, भोसरी पुणे-२६ येथील या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत, त्यांना घरकुला साठी शासनाचे अनुदान मिळावे म्हणून, प्रा. बी. बी. शिंदे यांनी परंतू सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गेली पाच वर्षां पासून सततचा पाठ पुरावा करत आहोत, वेळोवेळी आंदोलन व पत्रव्यवहार करत आहोत परंतू प्रशासन आज पर्यंत काहीना काही त्रुटी काढून महानगरपालिका आयुक्त यांचे कडून अनुदान देण्यास टाळाटाळ केली जात आहे. परंतु दिनांक ३० ऑक्टोंबर २०२३ रोजी शासनाच्या समाज कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई येथून आमच्या या सामाजिक संघटनेने आयुक्तांच्या नावे पात्र लाभार्थ्यास अनुदान देण्यात यावे असा आदेश, लेखी पत्र आणून आयुक्तास समक्ष भेटून दिले आहे. तरीही अतिरिक्त आयूक्त उल्हास जगताप व दूसरे अतिरिक्त आयूक्त आण्णा बोधडे हे दोन अतिरिक्त आयूक्त सतत टाळाटाळच करत आहेत.
सोबत कमिशन पोटी १५% मागीतले जातात असे प्रा. बी. बी. शिंदे यांनी सांगीतले या वेळी यूवराज दाखले यांनी दोन्ही आयूक्तांना जर आमची मागनी कळत नसेल तर आशा आयूक्तांना मी साडी चोळी भेट देणार आहोत तसेच कमिशन पोटी जे १५%ची मागनी केली गेली आहे ती मागनी मी व माझे सहकारी पिंपरी चिंचवड मधून भिख मागून पूर्ण करून देतो असे बोलले आहेत

