वाकड, दि. २७ (शफीक शेख, मूकनायक) :- इन्स्टाकार्ट सर्व्हिस प्रा. लि. काळेवाडी, पुणे या फ्लिपकार्टच्या हब मोबाइलची चोरी करणार्या दोन डिलीव्हरी बॉय यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ५,९१,२४४ रुपयांचे २४ मोबाईल फोन जप्त करण्यात वाकड पोलिसांना यश आले असून त्याबाबत परिसरातून पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाकड पोलीस ठाणे येथे दिनांक १८/११/२०२३ रोजी इन्स्टाकार्ट सर्व्हिस प्रा. लि. काळेवाडी, पुणे या फ्लिपकार्टच्या हबमधील मॅनेजर यांनी त्यांचे हबमधील एकुण ९,४७,१६०/- रुपये किंमतीचे विविध कंपनीचे एकुण ३८ मोबाईल चोरीस गेलेबाबत तक्रार दिली होती त्यावरून वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. १९९३/२०२३ भा.द.वि.कलम ३८१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांच्या आदेशावरून तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई करीत सुरवातीला डिलीव्हरी बॉय म्हणुन काम करणारा आशिष भाऊसाहेब भोसले, वय २२ वर्षे, रा. रमाबाई नगर, पिंपरी लिंकरोड, दावत राईस शेजारी, सिमला हॉटेलजवळ, पिंपरी, पुणे यास व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले असता एकुण ०८ मोबाईल फोन मिळाले. पुढे आणखी तपास केला असता आरोपी नामे पियुष गोविंद मोहिते, वय २३ वर्षे, रा. नमो सृष्टी अपार्टमेंट रुम नं. बी / ३०१, गणेश इंटरनॅशनल स्कुल शेजारी, नेवाळे वस्ती, चिखली, पुणे याचे नाव निष्पन्न झाल्याने त्यास अटक करुन केली. तपासात सर्व आरोपींकडून एकुण ५, ९१, २४४/- रुपये किंमतीचे विविध कंपनीचे २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. दाखल गुन्ह्यातील उर्वरित मोबाईलबाबत तपास सुरु आहे.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो, सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त, परि २ पिंपरी चिंचवड, श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड व.पो.नि., मा. श्री. विठ्ठल साळुंखे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि. संतोष पाटील, पोउपनि. सचिन चव्हाण, बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, स्वप्निल खेतले, दिपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, वंदु गिरे, प्रशांत गिलबीले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, कौतेय खराडे, विनायक घारगे, रमेश खेडकर, सागर पंडीत यांनी मिळुन केली आहे.

