Thursday, February 26, 2026
Homeदौंडदौंड शहरात मनोज जरांगे यांचे भव्य स्वागत.

दौंड शहरात मनोज जरांगे यांचे भव्य स्वागत.

मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे

मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन केले

दौंड – मराठा योध्दा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठ्यांची विराट सभा ही पुणे जिल्ह्यातील पहिला टप्पा दौंड तालुक्यातील वरवंड येथे होणार असताना सकल मराठा समाज दौंड शहर व तालुका यांचे विनंतीस मान देऊन दौंडयेथे काही वेळ थांबुन छ.शिवाजी महाराज चौक येथे मनोज जरांगे यांनी मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन केले .या वेळी सकल मराठा समाज दौंड शहर व तालुका यांचे कडून भव्य स्वागत करण्यात आले यावेळी जरांगे यांना पाहण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी व समाज बांधव उपस्थिती होते.
दौंड येथे बोलताना संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी म्हटले 24 डिसेंबरला आरक्षण मिळणारच आमचे ठरले आहे सरकारचे आणि आपले ठरले आहे की नोंदणीच्या आधारावर अहवाल बनवायचा आणि तो अहवाल सरकारने 24 डिसेंबर च्या आत कायदा पारित करून समस्त मराठा समाजाला आरक्षण द्यायचे जर कोणाला कुणबी दाखला नको हवा असेल तर त्यांनी घेऊ नका परंतु जे गोरगरीब आहेत त्यांना घेऊ द्या आरक्षणा मुळे त्यांचे कल्याण होऊ द्या जरांगे पुढे असेही म्हणाले 70 वर्षांपूर्वी जर आम्हाला आरक्षण दिले असते तर आज आम्ही प्रगत असतो सत्तर वर्षापासून झालेले आमचे नुकसान भरून काढण्यासाठी आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण द्यावे व आमच्या नोकऱ्यांच्या जागेवर लागलेले जे कोणी असतील त्या सगळ्यांना बाहेर काढून टाका व त्यांची संपत्ती सुद्धा जप्त करा असे जरांगे यांनी दौंड येथे बोलताना सांगितले सरकार आरक्षण कसे देत नाहीत ते आपण बघू काळजी तुम्ही करू नका आरक्षण मिळाल्याशिवाय तुमचा मुलगा एक इंच ही मागे सरणार नाही असा सरकारला इशारा दिला.
दौंड येथील सभा संपल्यावर जरांगे यांच्या गाड्यांचा ताफा वरवंडच्या दिशेने रवाना झाला, यावेळी संपूर्ण परिसरात एक मराठा लाख मराठा,
आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे
अशा घोषणाही देण्यात आल्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकल मराठा समाज दौंड शहर व तालुका यांचे मोठे योगदान मिळाले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments