Thursday, February 26, 2026
Homeदौंडदौंड शहरांमध्ये संविधान बचाव यात्रा ढोल ताशेच्या गजरात जंगी स्वागत...

दौंड शहरांमध्ये संविधान बचाव यात्रा ढोल ताशेच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले, लोकशाहीचा जागर लोकशाहीच्या आधार.

मूकनायक प्रतिनिधी: विजय बगाडे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व इंदुमिल आंदोलनाचे प्रणेते रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व समाजभूषण मा. काकासाहेब खंबाळकर अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २४ ऑक्टोंबर २०२३ पासून लोकशाही मार्गाने दीक्षाभूमी नागपूर येथून संविधान बचाव यात्री सुरुवात झाली ही संविधान बचाव यात्रा दीक्षाभूमी नागपूर इथून सुरू होऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे फिरून या यात्रेचा समारोप दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी चैत्यभूमी दादर मुंबई येथे येथे होणार आहे पुणे जिल्ह्याच्या दिशेने जात असताना सविधान बचाव यात्रेचे आगमन दौंड शहरांमध्ये आगमन दिनांक ११ /११/२०२३ रोजी झाले दौंड गोल्ड राऊंड या ठिकाणावरून सहकार चौक शालिमार चौक हुतात्मा चौक संत गाडगे महाराज स्मारक सम्राट अशोक सविधान स्तंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या सर्व ठिकाणी भव्य दिव्य सविधान यात्रेचे आयोजन केले होते सविधान यात्रेच्या रथामध्ये सविधान प्रस्ताविका ठेवण्यात आली होती दौंड शहराचे सविधान यात्रेचे व सभेची आयोजक आयु. अनिल (बापू) साळवे रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आयु. आनंद (दादा) बगाडे रिपब्लिकन सेना पुणे जिल्हा (पूर्व) अध्यक्ष गौतम साळवे माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते यांनी सविधान यात्रीची पूर्ण आयोजन केले होते सर्वत्र पंचशील ध्वज लावण्यात आले होते ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले होते संविधान यात्रेचे नेतृत्व समाजभूषण काकासाहेब खंबाळकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व महापुरुषांना पुष्पहार घालून अभिवादन करून दौंड पंचायत समिती समोर सभेच्या समारंभ ठिकाणी संविधान यात्रेचे नेतृत्व समाजभूषण काकासाहेब खंबाळकर अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सभेचे ठिकाणी स्वागत करण्यात आले पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले सभेच्या ठिकाणी संविधानाच्या विषयी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले सभेच्या ठिकाणी संविधान यात्रेचे नेतृत्व व समाजभूषण काकासाहेब खंबाळकर अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांनी आपले मनोगत व्यक्त करतात सांगितले पोलीस यंत्रण असेल किंवा महसूल खाते असेल सेंट्रल खाते असेल ते संविधानाला समोर ठेवून काम करीत असतात मग एखाद्या हक्कासाठी अन्याय झाला मला भारतीय संविधानाने विशिष्ट अधिकार दिलेले ते मिळाली नाहीत तो तेव्हा भारतीय नागरिक होत व निषेध करतो भारतीय नागरिकांना शिस्त लागावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्व संविधानाचा फार मोठा अभ्यास करून आपल्या भारत देशाला कशा प्रकारे उपयोगी असेल आम्ही संविधान बचाव यात्रा काढत असताना फक्त बुद्ध व मागासवर्गीय उपस्थित दिसतात याची खंत वाटते याचे कारण असे आहे की मागासवर्गीय ना कुणी जवळ करत नव्हते कोणी हॉटेलमध्ये चहासाठी बसू दिले जात नव्हता व लहान मुलांचे केस सुद्धा कापत नव्हते पण हे सर्व अधिकार सविधानाने दिले सविधान बचाव यात्राची वेळ आमच्यावर येत आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांची नोंद संविधाना प्रमाणे होते पण हे संविधान बचाव साठी पुढे काय येत नाही वास्तव पाहता बचाव यात्रा काढल्यानंतर दौंड नगरीमध्ये लोकप्रतिनिधी आहेत त्या बचावा यात्रेमध्ये उपस्थित होते नाही अशी सडकून टीका राष्ट्रवादी काँग्रेस पाटी व काँग्रेस वर केली एक आमदार आले होते माझे दर्शन घेऊन गेली थोरात आप्पा त्यांनीही पाठिंबा दिला असेही काकासाहेब खंबाळकर म्हणाले ज्या ठिकाणीं सभेचा कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी दौंड पंचायत ऑफिस कार्यालय आहे त्या ठिकाणी कुणी निवडून आलेले सदस्य तालुका सभापती उप सभापती तुमच्या समोर संविधान यात्रा ऑफिसमध्ये आले असताना तरी तुम्ही उपस्थिती आला नाही याची खंत वाटते संविधाना आस्था किती वाईट आहे संविधान वाचले तर आम्ही वाचणार संविधान वाचले तर तुम्ही वाचणार आपल्या देशाच्या राष्ट्रपती आदिवासी महिला आहे त्यांना सत्तेवरती बसवणारे आहे त्यांनी कधी स्वतंत्रता मध्ये भाग घेतला नव्हता काही काम केले नाही पण सन १९२५ ला स्थापन झालेला आर. एस. एस २०२५ ला १०० वर्ष पूर्ण शतक प्रति शत अशी घोषणा आहे त्या गोष्टीचा अर्थ असा आहे की प्रत्येकाच्या आम्ही ब्राह्मण पुढे असणार आहे सर्व शूद्र आहेत अशी आर. एस. एस ची धोरणा आहे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृति जाळली ज्याची मनुस्मृति होती आता त्याची सत्ता आहे असे वाटते अशी सडकून टीका आर एस एस वर केली नवीन संसद भवन उद्घाटन वळी राष्ट्रपती यांना आमंत्रित केले नाही कारण त्या आदिवासी शूद्र होत्या शिवाय त्या विधवा होत्या त्यांचे हात लागू नये म्हणून देशाचे पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी उद्घाटन केले पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची बायको सोडली यांना पण काही अधिकार नाही उद्घाटन करण्याचा सविधान बाजूला ठेवून हा खोडसर प्रकार चालू आहे याच्या आधीची सत्तेत असलेले काँग्रेस काळामध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची कन्या हे देखील विधवा होते त्यांना देखील पंतप्रधान होता आले ही संविधानाची ताकद आहे आपल्या सर्व लोकांना जागृत झाले पाहिजे. तसेच श्रीमती सारिका ताई सिताराम शिंदे प्रभारी: रिपब्लिकन सेना महिला आघाडी महा. राज्य यांनी सांगितले संविधानाचा प्रचार प्रसार जनसामान्या लोकापर्यंत व्हायला हवा संविधानाने हक्क अधिकार दिले समस्त भारतीयांना दिलेले असताना देखील एका विशिष्ट जातीलाच दिले आहेत असा सतत कांगावा करून जाणीवपूर्वक जन सामान्य माणसात पसरवला जातो जर आपण भारतीय संविधान वाचले पाहिजे अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल भारतीय संविधान हे कुण्या एका जातीसाठी नसून किंवा एका पंथासाठी लिहिलेलं नसून समस्त भारतीय हितासाठी सुखासाठी भारतीय संविधान हा पवित्र राष्ट्रीय असा एक ग्रंथ आहे समस्त भारतीयांना जोडणारा ग्रंथ आहे जे लोक सविधानाचा विरोध करतात त्या लोकांचे पण भारतीय संविधान रक्षण करते त्यांनी समजून घेतले पाहिजे कार्यक्रमाच्या शेवटच्या वेळी काकासाहेब खंबाळकर म्हणाले सविधान वाचवण्यासाठी सर्व लोकांना जागृत झाले पाहिजे व समस्त दौंडकरांनी ई व्ही एम मशीनचा देखील विरोध समस्त दौंडकरांनी केला पाहिजे अशी घोषणा केली व कार्यक्रमाचा समारोप केला कार्यक्रमाचा समारोप झाला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजयजी देखने साहेब पश्चिम महाराष्ट्र युवा लहुजी अमराळे रिपब्लिकन सेना महिला आघाडी कुंदाताई बगाडे पुणे जिल्हा युवती अध्यक्ष सौ रुक्मिणी ताई चव्हाण प्रशांतजी सोनवणे महासचिव रिपब्लिकन सेना पुणे जिल्हा पुणे जिल्हा युवा अध्यक्ष गणेश चव्हाण पुणे जिल्हा युवा निरीक्षक तुषार गायकवाड पुणे जिल्हा संघटक गणेश भोसले बारामती तालुका अध्यक्ष उमेश साळवे बारामती शहर अध्यक्ष अशोक शिंदे बारामती शहर युवा नेते अविनाश कांबळे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments