मुकनायक प्रतिनिधी :-प्रशांत सोनवणे
प्रभारी साहयक पोलिस निरीक्षक सचिन खामगळ साहेब यांची धडाकेबाज कामगिरी.
दि. ४ खानापूर शिवार ता जाफ्राबाद येथे एका इसमाने त्यांच्या शेतात स्वताच्या अर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररीत्या गांजाच्या झाडांची लागवड करुन त्यांचे संवर्धन व जोपासना करत आहेत अशी खात्रीलायक माहिती टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन खामगळ यांना गोपनीय माहिती मिळाल्याने याबाबत मा पोलिस अधीक्षक साहेब व मा उपविभागीय पोलिस अधिकारी साहेब भोकरदन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्याकामी तहसील कार्यालय सक्षम अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांना माहिती देऊन, दोन शासकीय पंचासह खानापूर शिवारात गट नं १३२ मध्ये शेतकरी इसम ज्ञानदेव भिवसन शिंदे, यांनी कपाशीच्या शेतात अवैध गाज्याची झाडे, लागवड करुन संवर्धन करीत असताना मिळुन आल्याने त्यांच्या शेतातुन एकुण ७० ,९८ किलो ओला गांजाची २३ झाडे एकुण ७०९८०० रुपये किंमतीची जप्त केली आहेत, सदर शेतकरी इसमास ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात एन डी पी एस , कायद्यानुसार गुन्हा दाखल प्रकिया सुरू आहे,सदर कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी दराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ साहेब, नायब तहसीलदार आकाश चव्हाण साहेब, कृषी सहाय्यक विजय जाधव साहेब, तलाठी नारायण ढाके, कनिष्ठ सहाय्यक सिध्देश्वर बोर्डे, पोलिस कर्मचारी पंडित गवळी, गजेंद्र भुतेकर, प्रदीप धोंडगे,सागर शिवरकर, दिनकर चंदनशिवे, अशोक धोंगे, संजय बेडवाल, होमगार्ड रामेश्वर घोडके, राहुल खरात, कैलास दुधाने, राहुल मघाडे, धम्मदिप आढावे , प्रकाश भुतेकर यांनी केली.

