Thursday, February 26, 2026
Homeपिंपरी-चिंचवडसम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीमसृष्टी येथील सकाळी भारतरत्न डॉ....

सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीमसृष्टी येथील सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

वरिष्ट प्रतिनिधी मूकनायक लक्ष्मण रोकडे पिंपरी चिंचवड
दि. २५ ऑक्टोंबर २०२३ काल अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ: बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीमसृष्टी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मावळ तालुक्यातील भाजे बुद्ध लेणीस भेट देण्यात आली. या लेणीतील मुख्य चैत्यगृहामध्ये बुद्ध वंदना घेण्यात आली.
लेणी प्रेमी सुरेश वाघमारे, रवी कांबळे, समाधान सोनवणे, यांनी थोडक्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त व लेणी संवर्धनाविषयी माहिती दिली.
बोधिसत्व यूट्यूब चॅनलचे संचालक सागर कांबळे यांनी लेणीतील मुख्य चैत्यगृहातील माहिती सांगितली व लेणी क्रमांक १ पासून माहिती देण्यास सुरुवात केली.
लेणीतील शिलालेख व काही लेण्यांची माहिती लेणी प्रेमी मनोज गजभार यांनी थोडक्यात सांगितली.
व सायंकाळी ७:३० वाजता भारतरत्न डॉ: बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीम सृष्टी येथे अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समितीद्वारे दीपोत्सव करण्यात आला या दीपोत्सवास पिंपरी चिंचवड शहरातील बौद्ध उपासक व उपासिका व बंधू भगिनींनी चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समितीचे सदस्य . प्रा. सुजाताई नवघरे, राजू भालेराव, प्रियाताई शेख, रोहिणीताई लादे, रवि कांबळे, महायान मसुरे, विलास नवघरे, बाळासाहेब रोकडे, *मूकनायक या वृत्तपत्राचे वरिष्ठ पत्रकार व अनुवाद आपला न्युजचे संपादक लक्ष्मण रोकडे,* प्रा. बी. बी. शिंदे, धर्मराज फडतरे, श्रुतीताई कांबळे, बेबीताई बोचकुरे, वंदनाताई गायकवाड, कौशल्य गजभार, सुमन गायकवाड, दीक्षाताई जोगदंड, ललिताताई प्रतिभाताई चौरे, इत्यादी सदस्य उपस्थित होते.
या दीपोत्सवची सर्व व्यवस्था बौद्ध उपासिका वंदनाताई यंकुळे व बौद्ध उपासक स्वामीनाथ यंकुळे त्यांच्याद्वारे करण्यात आली.
या दीपोत्सवाची दखल घेऊन देवेंद्र तायडे, जन मत न्युज चॅनलचे संचालक, सुनील वडमारे, डिफेन्स फोर्स लीगचे नरेश गोल्ला, भारतीय बौद्ध महासभेचे माजी शहराध्यक्ष बापू गायकवाड यांनी दहा पुस्तकांची भेट देऊन सर्व सदस्यांचे स्वागत केले.
व या वर्षी मूकनायक या वृत्तपत्राचे वरिष्ठ पत्रकार व अनुवाद आपला न्युजचे संपादक लक्ष्मण रोकडे यांनी बाबासाहेबांनी केलेल्या क्रांती विषयी व बुद्ध धम्मा विषयी भीमसृष्टीमध्ये आलेल्या युवक युवतींना प्रश्न विचारून त्यांचा प्रा. बी.बी. शिंदे यांच्या हस्ते बाबासाहेबांचे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी धर्मराज फडतरे यांनी पहिल्यांदाच कॅमेरामॅन म्हणून भूमिका बजावली.
पिंपरी चिंचवड येथील प्रख्यात गायक अनिरुद्ध सूर्यवंशी यांनीही भीमसृष्टी मध्ये भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमास राजन नायर व काही पत्रकारांनी दिलेल्या दानातून गितगायनाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमास भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्यांदा या कार्यक्रमास मावळ तालुक्यातील लेणी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते व हजारोंच्या संख्येने पिंपरी चिंचवड शहरातील भीम अनुयायी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने फुलांनी व विद्युत रोषणाईने स्मारक सजवण्यात आले होते त्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे खूप खूप आभार असे लेणी प्रेमी इतिहास प्रेमी सहकारी बोधिसत्व चॅनलचे मनोज गजभार यांनी सांगीतले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments