मुकनायक प्रतिनिधी:-प्रशांत सोनवणे
** बहुसंख्य कार्यकर्त्यांचा ** रिपब्लिकन सेनेमध्ये जाहीर प्रवेश,
*************************
काल दि.१९/१०/२०२३रोजी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानूसार तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर साहेब यांच्या सुचनेनुसार पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर, यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी संजय देखणे साहेब यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच पुणे जिल्हा कार्यकारिणी वर उत्तम खंडागळे यांची पुणे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी निवड करण्यात आली.तसेच हारून शेख यांची पुणे जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली.तसेच सिद्धार्थ साबळे यांची पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.ख्रिश्चन समाजाचे निलेश वानरे यांची पुणे जिल्हा सहसंघटक पदी निवड करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे ॲड.मल्हार तरडे यांची कायदेशीर सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे.आदी.पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या.त्याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांना सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होणारा दि.२४/१०/२०२३पासून नागपूर दिक्षा भूमी ते दि. ६/१२/२०२३ रोजी मुंबई येथे चैत्य भूमी या ठिकाणी नियोजित संविधान बचाव यात्रा याबद्दलचे मार्गदर्शन तसेच त्याबद्दलची रूपरेषा याबद्दलची माहिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय देखणे साहेब तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष संदीप रंधवे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिली. त्याप्रसंगी उपस्थिती मध्ये पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सदानंद गवई, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रेश्मा शेख, पुणे जिल्हा सचीव नंदीनी पवळे,पिंपरी-चिंचवड निरिक्षक मुकूंद रणदिवे,झो.सेल अध्यक्ष राजू गायकवाड, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष अजय गायकवाड, महासचिव दत्ताभाऊ गायकवाड, उपाध्यक्ष रंजीत घोबाळे, भोसरी विधानसभा अध्यक्षा उषा वाघमारे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष पार्वती बनसोडे, पुणे शहर सचीव आनंद गंगावणे, खेड तालुका अध्यक्षा आशा ताई कुटे, खेड तालुका अध्यक्ष विशाल दिवे आदी.पदाधिकारी उपस्थित होते.

