पिंपरी, दि. ३१ (शफिक शेख, मूकनायक) :- येथील पत्रकार लक्ष्मण रोकडे यांचे चिरंजीव प्रणव लक्ष्मण रोकडे, वय १८ वर्ष रा. नेहरूनगर येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले. प्रणव याच्या एकाएकी जाण्याने रोकडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हसत खेळत सर्वांमध्ये मिळून – मिसळून राहणारा मित्रांमध्ये सर्वांचा आवडता, असा गुणी मुलगा अचानक सोडून गेल्याने परिवारावर नव्हे तर नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यावर शोककळा पसरली आहे. वडिलांप्रमाणेच प्रणवही शूटिंग, कॅमेरा चालविण्यामध्ये कुशल होता.
प्रणव रोकडे याच्या पश्चात ३ बहिणी आणि वडील असा परिवार आहे. पत्रकार लक्ष्मण रोकडे हे डिजिटल मीडियाशी संलग्न पत्रकारिता करतात. तसेच चित्रपट दिग्दर्शक म्हणूनही ते ओळखले जातात. पिंपरी चिंचवड शहर डिजीटल मिडीयाच्या कार्यकारिणीमध्ये ते समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.

