Thursday, February 26, 2026
Homeपरभणी*समाज कल्याण-सामाजीक न्याय भवन कार्यालयात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची निर्दोष मुक्तता*

*समाज कल्याण-सामाजीक न्याय भवन कार्यालयात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची निर्दोष मुक्तता*

मुकनायक प्रतिनिधी
प्रशांत सोनवणे

शासनाविरोधात केले होते *ताला ठोको* आंदोलन

परभणी: राज्य सरकार विरूद्ध विविध प्रश्नावर लोकनेते विजयराव वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले विकास महामंडळ व सामाजिक न्याय विभाग कार्यालय, परभणी येथे घेराव आंदोलन करुन कार्यालयास टाळे ठोकण्यात आले होते.
शासनाच्या विविध योजना समाज कल्याण व महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाकडुन राबविण्यात दिरंगाई करीत असल्यामुळे घेराव आंदोलन करण्यात आले होते.
आंदोलनकर्त्यांवर नवा मोंढा पोलिस स्टेशन येथे विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते, या प्रकरणात न्यायाधीश श्री.तेलगावकर यांच्या न्यायपिठा समोर सदरील खटला चालवण्यात आला होता, तरी पुराव्या अभावी न्यायाधीश तेलगावकर साहेबांनी सर्व सहा आंदोलन कर्त्याची आज दिंनाक २७ स्पटेंबर २०२३ रोजी निर्दोष मुक्तता केली.
सदरील प्रकरणात ऍड.रवी गायकवाड यांनी आंदोलन कर्ते यांची बाजु घेत न्यायाधीशा समोर जोरदार युक्तिवाद केला आणि आंदोलनातील लोकनेते विजयराव वाकोडे, बी.एच.कांबळे, सतिष भिसे, किरण घोंगडे, चंद्रकांत बनसोडे, देवादास महामुने यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments