Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्र'व्हॉईस ऑफ मिडीया' संघटनेकडून 'देवदुतां'चा सन्मान

‘व्हॉईस ऑफ मिडीया’ संघटनेकडून ‘देवदुतां’चा सन्मान

* दरडींपासून वाड्यावत्स्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्याचा सर्वांचा निर्धार

खोपोली (जि. रायगड) / गोपीनाथ सोनावणे.:- खालापूर तालुक्यातील इरसाळवाडी येथे दि. 19 जुलै 2023 रोजी दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेप्रसंगी आपल्या जिवाची पर्वा न करता बचाव कार्य करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांसह सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी व कर्मचारी या ‘देवदुतांचा सन्मान’ सोहळा आज खोपोली सहकार नगर येथील रोटरी क्लब हॉलमध्ये ‘व्हॉईस ऑफ मिडीया’ या राष्ट्रीय पत्रकार संघटनेकडून आयोजित करण्यात आला होता. खोपोली, खालापूर, कर्जत तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील जवळजवळ 150 देवदुतांचा सन्मान मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश नरसिंह चिवटे, आ. महेंद्रशेठ थोरवे यांचे प्रतिनिधी तथा शिवसेना पक्षाचे कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खोपोली शहर प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील, शिवसेना खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील, माजी नगरसेवक अमोल जाधव, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संघटनेचे गुरूनाथ साठेलकर, खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉं. अनिलकुमार शहा, बसपा रायगड जिल्हाध्यक्ष सचिन भालेराव, खोपोली नगर परिषद उपमुख्याधिकारी गौतम भगळे, सा. बा. विभाग खालापूर उपअभियंता राखाडे, सामाजिक कार्यकर्ते कैलास गायकवाड, विरांगणा संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा खेडकर, सामाजिक कार्यकर्त्यां कांचन जाधव, व्हॉईस ऑफ मिडीया रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर माने, ठाणे जिल्हाध्यक्ष अरूण ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते रवी रोकडे, उद्योजक भदोरीया आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन खालापूर तहसिलदार अय्युब तांबोळी यांच्या हस्ते व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खोपोली शहर प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील, शिवसेना खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संघटनेचे गुरूनाथ साठेलकर, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठौड आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भक्ती साठेलकर, तहसिलदार अय्युब तांबोळी, संदीप पाटील यांनी दुर्घटना व बचाव कार्य करतांना आले अनुभव कथन केले. अतिशय बिकट परिस्थितीत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संघटनेसह सर्वच सामाजिक संघटना, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी प्रातांधिकारी अजित नैराळे व खालापूर तहसिलदार अय्युब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केल्याचे सर्वांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

* मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून कोट्यवधी रूपयांच्या निधी वितरीत :- कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश नरसिंह चिवटे आपल्या मनोगतात म्हणाले की, आज मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष महाराष्ट्रातील अनेकांसाठी महत्वपूर्ण ठरले आहे, अनेकांचे प्राण या कक्षाकडून वाचविण्यात आले आहेत. अवघ्या 14 महिन्यात 14 हजारांहून अधिक रुग्णांना 112 कोटी 12 लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमधून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाईन प्रक्रिया असल्याने कुठलेही फसवणूक होण्याची शक्यता नाही तसेच कोणत्याही दलालाची गरज नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

* मुख्यमंत्री साहेबांनी स्विकारले पालकत्व :- इरसाळवाडी दुर्घटनेत 22 मुले अनाथ झाली असून ‘या’ अनाथ मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारले आहे, अशी माहिती देतानाच गणेशोत्सवापूर्वी या मुलांच्या नावाने प्रत्येकी 5 लाखांची ‘एफडी’ केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली. इरसाळवाडी येथील आदिवासी बांधवांच्या पुनर्वसनासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढाकार घेत असल्याचे ही त्यांनी सांगितले.

* व्हॉईस ऑफ मिडीया संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक :- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खोपोली शहर प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील यांनी ‘व्हॉईस ऑफ मिडीया’ या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या आजच्या आगळ्यावेगळ्या सन्मान सोहळ्याचे कौतुक केले. तसेच आ. महेंद्रशेठ थोरवे यांचे प्रतिनिधी तथा शिवसेना पक्षाचे कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील यांनी देखील सन्मान सोहळ्याला देण्यात आलेल्या नावासह संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. यासह उपस्थित मान्यवर व सन्मानमूर्ती यांनीही आयोजकांचे कौतुक केले.

* आ. महेंद्र थोरवे फाउंडेशनकडून सहकार्याचे आश्वासन :- कर्जत-खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघात दरडींपासून वाड्यावत्स्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती व उपक्रम राबविण्याचे सांगत ‘व्हॉईस ऑफ मिडीया’ ही राष्ट्रीय पत्रकार संघटना नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवित असते, यापुढे त्यांना आ. महेंद्र थोरवे फाउंडेशनचे नेहमीच सहकार्य राहिल, असे आश्वासन आ. महेंद्रशेठ थोरवे यांचे प्रतिनिधी तथा शिवसेना पक्षाचे कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील यांनी दिले.

* डॉं. सुनील पाटील घेणार पुढाकार :- खोपोली नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कर्जत-खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉं. सुनील गोटीराम पाटील यांनी दरडग्रस्त भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करणे, इरसाळवाडीसारखी दुर्घटना पुन्हा होवू नये यासाठी उपाययोजना करणे, याबाबत पुढाकार घेण्याचे मान्य करतानाच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संघटनेचे गुरूनाथ साठेलकर यांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करावेत असेही आवाहन केले. आपल्या मनोगतातून डॉं. सुनील पाटील यांनी सत्कारमूर्तींसह आयोजकांचे मनोबल वाढविले.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी व राष्ट्रीय महासचिव खलील सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर गोविंद माने यांच्या नेतृत्वाखाली ‘व्हॉईस ऑफ मिडीया’ संघटनेचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र विष्णू जाधव, रायगड जिल्हा संघटक अभिजीत दरेकर, रायगड जिल्हा संपर्क तथा प्रसिद्धी प्रमुख गोपीनाथ सोनवणे, रायगड जिल्हा महिला संघटक हेमलता चिंबुळकर, महिला जिल्हा उपाध्यक्षा उषाताई मुंडे, खालापूर तालुका अध्यक्ष दिपक जगताप, कर्जत तालुका अध्यक्ष संकेत घेवारे, सुधागड तालुका अध्यक्ष निवास सोनावळे, खालापूर तालुका महिला अध्यक्ष किशोरीताई चेऊलकर, खालापुर तालुका डिजीटल विंग अध्यक्ष जितेंद्र भोईर, खालापूर तालुका साप्ताहीक विंग अध्यक्ष आदित्य सोनावणे, खालापूर तालुका कार्याध्यक्ष संतोष मोरे, खालापूर तालुका उपाध्यक्ष सुधीर देशमुख, खालापूर तालुका उपाध्यक्ष साबीर शेख, खालापूर तालुका सरचिटणीस संतोष गोतारणे, साप्ताहीक विंग खालापूर तालुका सचिव मनोहर कांबळे, डिजिटल विंग खालापूर तालुका सरचिटणीस गणेश मोरे, खालापूर तालुका सहचिटणीस संजय पाटील, खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंखे, खोपोली शहर उपाध्यक्ष शिवाजी जाधव, खोपोली शहर संघटक प्रवीण कोल्हे, खोपोली शहर सहचिटणीस जमालुद्दीन शेख आदींनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments