Thursday, February 26, 2026
Homeफलटणमेंढपाळ हत्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चात फलटणमध्ये उस्पूर्त प्रतिसाद.

मेंढपाळ हत्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चात फलटणमध्ये उस्पूर्त प्रतिसाद.

मुकनायक प्रतिनिधी:-प्रशांत सोनवणे

दि. २२ फलटण :नाईक बोमवाडी येथील कारंडे या कुटुंबावरती 10 सप्टेंबर रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी साध्या गणवेशात व प्रायव्हेट गाडी घेऊन चव्हाण व कारुंडे या कुटुंबामध्ये पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार नसताना चतुरे नामक पोलिसांने दमदाटी करण्याच्या उद्देशाने कारंडे यांना धमकवण्याचा प्रयत्न केला व पोलीस कर्मचारी हा साध्या गणवेशात असल्यामुळे कारंडे या मेंढपाळ कुटुंबाला लक्षातच आले नसल्यामुळे थोडी झटापट झाल्यानंतर चतुरे व फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मोठा ताफा घेऊन कारंडे परिवारातील 18 महिला व पुरुषांना बेदम मारहाणपली तसेच त्यांच्यावरती खोटे 353 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले यामध्ये 16 सप्टेंबर रोजी कैलास वार्षिक कुंडलिक कारंडे या मेंढपाळाचा मृत्यू झाला तसेच यामध्ये सहा महिलांना कोणत्याही महिला कर्मचारी नसताना बेदम मारहाण करण्यात आले याचा निषेध नोंदवण्यासाठी व हे खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी आज फलटण मध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने निषेध मोर्चा आयोजित केला होता या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाने तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा व कारंडे परिवारा वरती जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा असे अशी मागणी केली. या मोर्चामध्ये ऑल इंडिया दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आघाडीच्या उपाध्यक्ष प्रियदर्शनी ताई निकाळजे, धनगर समाज युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष घनश्याम बापू हक्के, छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पैलवान आप्पासाहेब आखाडे, मौर्य क्रांती सेनेचे सोलापूरचे नेते अर्जुन दादा सलगर बऱ्याच ओबीसी आदिवासी दलित समाज संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. लवकरात लवकर कारवाई केली नाही तर कायदा हातात घेण्यास मागे पुढे घेण्याचे पाहणार नसल्याचा निर्धारित या मोर्चात व्यक्त करण्यात आला.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments