मुकनायक प्रतिनिधी
प्रशांत सोनवणे
बारामती शहर व तालुक्यात आज दि ३ दुपारी चारनंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले सुमारे तासभर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला ,या पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याने भरले गेले बारामती नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे बारामती शहरातील प्रशासकीय भवनाच्या शेजारील घरामध्ये पावसाचे पाणी गेल्याने छत्रपती शाहू महाराज नगर येथील रहिवाशांचे हाल झाले आहेत येथील नागरिकांच्या वतीने रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हा महासचिव प्रशांत सोनवणे यांनी बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना फोन करून माहिती देऊन छत्रपती शाहू महाराज नगर येथे बोलवुन या भागातील ड्रेनेज चे कामे दोन दिवसांत करून द्यावी अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने बारामती नगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे, त्या वेळी रोकडे साहेब यांनी दोन दिवसांत ड्रेनेज चे काम करुन देण्यात येईल असे आश्वासन दिले त्या वेळी बारामती नगरपालिके चे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे व छत्रपती शाहू महाराज नगर येथील रहिवाशी उपस्थित होते,

