Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक विवाहितांना धक्का देणारे हायकोर्टाचे महत्वपूर्ण निरीक्षण, लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देणे...

धक्कादायक विवाहितांना धक्का देणारे हायकोर्टाचे महत्वपूर्ण निरीक्षण, लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देणे क्रुरता.

मुकनायक प्रतिनिधी
प्रशांत सोनवणे

मुंबई, कौटुंबिक वाद किती टोकाला जातो यांचे अनेक उदाहरणे आहेत. नुकताच एका माहितीनुसार लग्नानंतर आपल्या जोडीदारासोबत लैंगिक संबंध न ठेवणे क्रुरता ठरणार असल्याचे धक्कादायक निरिक्षण हायकोर्टाने नोंदवले आहे. वैवाहिक जीवन जगणाऱ्या प्रत्येकाच्या रोजच्या जगण्याशी संबंध असलेल्या निरीक्षणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे, वैवाहिक जोडीदाराने हेतुपुरस्सर आपल्या साथीदारांशी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देणे क्रुरता असल्याचे मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केले, एका दांपत्याचा घटस्फोटाचा कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निर्णय कायम.
ठेवताना उच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले या दांपत्याचा विवाह अवघ्या ३५ दिवस टिकला न्या सुरेश कुमार कैत व न्या निना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने या प्रकरणी पत्नीची याचिका फेटाळली, घटस्फोट मंजूर करणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध तिनें उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती,ती फेटाळताना उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेला लैंगिक संबंधाशिवाय लग्न हा शाप आहे,या निर्णयाचा संदर्भ दिला लैंगिक संबंधांचा अभाव हे वैवाहिक जीवनासाठी अत्यंत घातक आहे असे मत न्यायालयाने नोंदविले , हुंड्यासाठी केली होती तक्रार घटस्फोटासाठी हायकोर्टात पोहोचलेल्या या प्रकरणातील महिलेने सुरूवातीला हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार नोंदवली होती, मात्र त्याचा कोणताही भक्कम पुरावा ती देऊ शकली नाही,या पार्श्वभूमीवर खंडपीठाने आदेशात नमूद केले की यापुर्वी एका प्रकरणात
उच्च न्यायालयाने नमुद केले होते की पती पत्नीने विशेषतः नवविवाहित असताना लैंगिक संबंधास जाणुनबुजून नकार देणे हे क्रुरतेच लक्षण आहे,ते घटस्फोटासाठी सबळ कारण ठरू शकते असे न्यायालयाने नोंदविले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments