मूकनायक प्रतिनिधी: विजय बगाडे
दौंड –
जालन्यातील सराठी येथे लोकशाही व शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणा साठी आजपर्यंत मराठा समाजाने काढलेले 58 मोर्चे हे अतिशय शांततेच्या मार्गाने झाले जगभरात याची दखल घेण्यात आली मात्र जालण्यात मराठा आक्रोश मोर्चावर जो लाठीचार्ज करण्यात आला आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी व चुकीची आहे त्याचा जेवढा निषेध करू तेवढा कमीच आहे, या घटनेमुळे मराठा समाजाच्या भावना प्रचंड दुखावल्या आहेत आवश्यकता नसताना ज्यांनी लाठीमार व गोळीबाराचा आदेश दिला त्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे तसेच मराठा आरक्षणासाठी त्वरित कार्यवाही व्हावी लाठीचार्ज देण्याच्या आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी .
या मागणीचे निवेदन आज २/९/२०२३ रोजी सकाळी ११,०० वाजता, मा, पोलिस निरीक्षक साहेब, दौड पोलिस स्टेशन व दौंड तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी उमेश वीर,गणेश जगदाळे,नंदू जगताप,दिनेश फराटे,सुनील जगदाळे तसेच
दौंड तालुका व शहरातील आखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि शहरातील सर्व मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

