मूकनायक प्रतिनिधी :- चंदगड
ग्रामपंचायत करंजगांव व हेरे, ता. चंदगड येथील मनमानी काराभाराबाबत दि.८/०८/२०२३ रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे दिलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने दि. १०/०९/२०२३ पर्यंत दोषींवर निलंबन व गुन्हे दाखल कारवाई न झाल्यास दि.११/०९/२०२३ रोजी पासुन जिल्हा परिषद कार्यालय, कोल्हापुर समोर *सत्याग्रही धरणे आंदोलन* करणार असल्याचे कळविले होते.
संबंधित तक्रारीस अनुसरुन ठोस पुरावे असुनही अदयाप कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद कार्यालय, कोल्हापुर समोर सत्याग्रही धरणे आंदोलन दि. ११/०९/२०२३ पासुन सुरु केले आहे.
सविस्तर माहीती-
१) रमाकांत गावडे (हेरे,ता.चंदगड) यांना ग्रामपंचायत कार्यालयाचा दुरुपयोग करत खोटे जाब-जबाब देत व पंचायत समिती चंदगड कडुन खोटया गुन्ह्यात अडकवुन ३ वर्ष शारीरीक, मानसिक छळ केल्याप्रकरणी चौकशीअंती दोषी आढळुनही दोषींवर अदयाप कारवाई झाली नाही.
२) साताप्पा प्रसादे यांच्या तक्रारीनुसार ग्रामपंचायत हेरे, ता.चंदगड यांनी बेकायदेशीर वृक्षतोड व अपहार प्रकरणी ५ वर्षापुर्वी तक्रार देवुनही अदयाप कोणतीच कारवाई नाही.
३) आयु. अंकुश कांबळे यांच्या तक्रारीनुसार ग्रामपंचायत करंजगांव, ता.चंदगड कडील १५% अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांचे अनुदान रक्कम खोटया सह्यांच्या आधारे मनमानीपणे खर्च केली आहे, आर्थिक अपहार, महीला सरपंचांच्या पतीचा हस्तक्षेप संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने चौकशीवेळी ठोस पुरावे आढळुनही दोषीं ग्रामसेवक, क्लार्क, ग्रामपंचायत कार्यकारीणी (करंजगांव) यांचेवर कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही तसेच दोषींना पाठीशी घालणा-या मा. विस्तार अधिकारी (चौकशी) व मा. गटविकास अधिकारी – पंचायत समिती, चंदगड यांच्यावर निलंबनाची कारवाई व गुन्हे नोंद व्हावेत याकरीता मागणी केली होती.
ग्रामपंचायत हेरे, करंजगांव व पंचायत समिती, चंदगड या संबंधित दोषींवर निलंबनाची कारवाई होवून गुन्हे दाखल व्हावेत या मागणी करीता गेल्या २ दिवसांपासुन जिल्हा परिषद कार्यालय , कोल्हापुर समोर सत्याग्रही धरणे आंदोलन सुरु असुन प्रशासनाकडुन कोणत्याच प्रकारचे सहकार्य नसलेलेबाबत आंदोलक रमाकांत गावडे व आयु. अंकुश कांबळे यांनी शासंकता व खंत व्यक्त केली आहे.

