Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्र*अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्षामध्ये विशेष प्रवेश संधी द्यावी : अमोल वेटम*

*अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्षामध्ये विशेष प्रवेश संधी द्यावी : अमोल वेटम*

*पुणे विद्यापीठ प्रमाणे शिवाजी विद्यापीठाने निर्णय घ्यावा*

सांगली दि १८ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उन्हाळी २०२२ (विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवविज्ञान व आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखांतील पदवी अभ्यासक्रमांसह) परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गामध्ये विशेष प्रवेश संधी देण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. याबाबतचे परिपत्रक १९७ /२०२३ अन्वये पुणे विद्यापीठाने काढले आहे. अशाच प्रकारे शिवाजी विद्यापीठ यांनी देखील ‘कॅरी ऑन’ बाबत निर्णय घ्यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचे संपूर्ण एक वर्ष वाया जाणार नाही. याबाबतची मागणी रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी केली आहे.

प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्रकरिता किंवा जेथे लागू असेल तेथे द्वितीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षाच्या सातव्या सत्राकरिता तात्पुरता प्रवेश काही अटी व शर्तीच्या अधिन राहून देण्यात यावा व त्याबाबतचे विहीत हमीपत्र प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने महाविद्यालयाकडे सादर करणे अनिवार्य करावे. तात्पुरता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी जसे अध्ययन, प्रात्यक्षिके, सत्रकर्म, फिल्ड व्हिजिट व इतर बाबी महाविद्यालयाने इतर नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे पूर्ण करून घ्याव्यात. त्याबाबतच्या परीक्षा व इतर बाबी या येत्या हिवाळी २०२३ या परीक्षांमध्ये अनुशेषाने विषय पूर्णतः उत्तीर्ण होऊन जे विद्यार्थी प्रचलित तृतीय / चतुर्थ वर्गामध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतील अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश पुढील वर्षांकरिता सुरू ठेवण्यात यावा अशी मागणी अमोल वेटम यांनी केली.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments