अज्ञान जितके अधिक तितका अहंकार मोठा याच्या उलट सामंजस्य वृत्तीची धारणा केल्याने माणसाच्या जीवनात समस्या निर्माण होत नाहीत किंवा जर समस्या निर्माण झाल्याच तर त्या सुटायला वेळ लागत नाही. ज्ञानातून शहाणपण निर्माण होते व शहाणपणातून तर सामजस्य वृत्ती उदयाला येते.खरे ही सामंजस्य वृत्ती आजच्या तरुणा मध्ये बघायला मिळत नाही याचे कारण म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये आणि डोक्यामध्ये पेरलेला जातीय द्वेष, परंतु येथे महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो हा की, जाती व्यवस्था मोडायची म्हणजे नेमके काय करायचे? जाती व्यवस्था मोडली पाहिजे असे शंभर वर्षे म्हणत आहोत. परंतु ‘जाती व्यवस्था’ या शब्दामध्येच ‘व्यवस्था’ हा शब्द व्यवस्था होती आणि आहे म्हणूनच जाती व्यवस्था टिकून राहिलेली आहे.
अस्तित्वात असलेल्या जाती त्या मोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्याना इष्ट वळण लावणे आवश्यक आहे . जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून शिक्षण संवर्धन व दारिद्र्य निर्मूलन या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर राष्ट्राच्या सर्व शक्ती जर केंद्रीभूत केल्या तर जाती व्यवस्थेमध्ये जे विष आहे ते काढून टाकता येईल. माणसाला रोग झाला तर त्या रोगाचे निर्मूलन करायचे असते, माणसाला मारायचे नसते, त्याचप्रमाणे अज्ञान, अंधश्रद्धा व दारिद्रय हे समाजाला तसेच तरुण पिढीला जडलेले रोग आहेत. हे रोग नष्ट करण्यासाठी सर्व तरुण पिढीला सक्तीचे मोफत शिक्षण दिले गेले पाहिजे आणि लोकांचे दारिद्र्य नष्ट करण्यासाठी प्रचलित अर्थ व्यवस्थेत बदल झाले पाहिजेत, तरच आजच्या तरुणांना जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी मिळेल.
अजिंक्य अनिल पाटील
सांगली
Mob . 7276018498

