दौंड मूकनायक प्रतिनिधी: विजय बगाडे
दौंड तालुका माजी सैनिक सहकारी गृहरचना संस्था मर्यादित दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे यांना शासनाने दौंड शहरातील महसूल खात्याची गट नंबर ९२/ब मधील 0 हे ४५ आर ही जागा दिनांक ३१/०८/२००९ रोजी ३६ माजी सैनिकांना दिली आहे पैरा नंबर १ मधील जागा मागणीच्या प्रकरण आम्ही मागासवर्गीय यांना वगळले आहे त्यामुळे आम्ही माझे सैनिक शहीद विधवा अपंग सैनिक यांनी गट ९२/ ब मधील 0 हे ४० आर नियोजित माजी सैनिक मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित दौंड यांनी जागा मागणी शासनाकडे केलेली आहे प्रस्तावाची पूर्तता तयार करून पाठविले आहे तो प्रस्ताव मा.जल्हाधिकारी पुणे यांनी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे जागेचा प्रस्ताव पाठविला आहे तो प्रस्ताव मा. डॉ.दिपक म्हैसेकर विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांनी जावक क्रमांक मह/२/ जमिन पुणे/ जमीन मागणी/ सी.आर./३५/२०१६ दिनांक १४/१२/२०१८ रोजी मा.अपर मुख्य सचिव महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क मंत्रालय मुंबई ३२ यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे तेव्हापासून सदरील प्रस्ताव महसूल खात्याकडे सुमारे पाच वर्ष पासून प्रलंबित आहे त्या कारणास्तव आम्ही सर्व माजी सैनिक आज रात्री दिनांक १०/०८२०२३दौंड या ठिकाणावरून मुंबई आझाद मैदान या ठिकाणी दिनांक ११/०८/२०२३ रोजी अमरण (प्राणांतिक) उपोषण करणार आहोत गेली आठ वर्ष प्रयत्न या करीत आहे माजी सैनिकांना त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांना जमीन कसण्यासाठी व राहण्यासाठी प्रकरण शासनाने आठ वर्षापर्यंत फक्त चलनासाठी प्रलंबित ठेवले आहे मा. मागील वेळी आझाद मैदान येथील आंदोलन केले असताना महसूल सचिव मा. श्रीराम यादव यांनी माजी सैनिक आंदोलन स्थगित करा लवकरात लवकर शासन दरबारी विचार करून मागासवर्गीयांच्या मागण्या मान्य करू असे आश्वासन श्रीराम यादव यांनी दिले होते तरी शासनाने याची दखल घेतली नाही आज दिनांक १०/०८/२०२३ रोजी या ठिकाणी मुंबई मंत्रालयावर धडक मोर्चा घेऊन जात आहोत उद्या सकाळी दिनांक ११/०८/२०२३ रोजी ठीक ११:०० वाजता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी माजी सैनिकांचे व सहकारी आमरण उपोषण करीत आहे तरी शासनाने याची दखल घेऊन पुढील पाठपुरावा करून या बाबत शासनाने प्रश्न सोडून मदत करावी अशी मागणी सुरेश रामचंद्र सकट सामाजिक कार्यकर्ते यांनी असे असे माजी सैनिकांच्या वतीने विनंती केली सर्व सर्वांनी राष्ट्रध्वज हातात घेऊन भारत माता की जय अशा जोरदार घोषणाबाजी केली माजी सैनिकांचे पुढीलपैकी नावे माजी सैनिक अनिल जयवंत खणसे यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिक हनुमंत बन्सीराम लांडगे माजी सैनिक कालिदास हरिदास शेंडगे माजी सैनिक दत्तात्रय बबन पवार माजी सैनिक तुकाराम बबन सूर्यवंशी माजी सैनिक हनुमंता शिवराम कोपनर माजी सैनिक संतोष आनंद दिवेकर सुधीर वाघमारे सामाजिक कार्यकर्ते व बहुजन रयत परिषद सहाय्यक व आर. टी. आय कार्यकर्ते श्री जयदीप बगाडे अमर जोगदंड पप्पू बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते हा लढा जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत पर्यंत लढणार अशी प्रतिक्रिया माजी सैनिकांनी केली.

