Thursday, February 26, 2026
Homeबारामतीबारामती : सिटी इंन चौक मधील रस्ता गेल्या १५ दिवसांपासून वाहतुकीच्या कारणास्तव...

बारामती : सिटी इंन चौक मधील रस्ता गेल्या १५ दिवसांपासून वाहतुकीच्या कारणास्तव बंद केलेला चालु कधी होणार स्थानिक व्यापारी वर्गाला पडला प्रश्न ❓❓

मुकनायक प्रतिनीधी
प्रशांत सोनवणे

बारामती शहर परिसरातील
सूर्यनगरी व सिटी इन चौक येथील रस्ता वाहतुकीस बंद केल्याने आसपासच्या व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे,असे येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच तांबेनगर मधून सूर्यनगरी मध्ये व सूर्यनगरी मधून तांबेनगर मद्ये जाण्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
या चौका मध्ये ट्रॅफिक ३-४ तास जास्त असते त्या वेळेस वाहतुक पोलिसांनी चौका मध्ये थांबून कंट्रोल केले तर नीट होईल तसेच येथील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाय शोधल्यास हा रस्ता बंद करण्याची गरज भासणार नाही असे नागरिकांचे मत आहे. हा चौक बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान कोणु भरून देणार आहे असा प्रश्न या व्यापारी वर्गामधून आता विचारला जात आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments