मुकनायक प्रतिनीधी
प्रशांत सोनवणे
बाललैगिक अत्याचार प्रकरणी सिध्दार्थ दादाराम गायकवाड याला बारामती येथील जिल्हा न्यायधिक्ष जे एल गांधी यानी १० वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली या खटल्यात सरकार पक्षाला लिपिक वर्षा सुतार , पोलीस उपनिरिक्षक गोरख कसपटे ,साय्हक पोलीस फौजदार नामदेव नलवडे यानी सहकार्य केले याच खटल्यात अनुसुचित जाती जमाती कायद्या अर्तगत १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली महत्वाचे म्हणजे या खटल्यात फिर्यादी व साक्षीदार फितुर झाल्याने त्याच्या वर देखील सीआरपीसी ३४० प्रमाणे कारावाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत या प्रकरणी वालचंद नगर पोलीस स्टेशन मध्ये पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली होती त्यानुसार त्याच्या विरोधात बाललैगिक अत्याचार अधिनियम बलत्कार व ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता ,दि १७ मार्च २०१८ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती ,गायकवाड याने पिडीत आल्पवयीन मुलीला घरात बोलवुन तिच्यावर दोन वेळा बळजबरीने बलत्कार केला होता तसेच ही घटना कोणाला सागितल्यास तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली होती तात्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी बापु बागर यानी या घटनेचा तपास करत आरोपी विरुध्द दोषारोपत्र दाखल केले होते या खटल्यास सरकार पक्षाच्या वतीने विषेश सरकारी वकिल ज्ञानदेव शिगाडे यानी काम पाहिले त्यानी सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासले त्या मुळे फिर्यादी म्हणजेच पिडीतीचे आई ,वडील यानी न्यायालयात साक्ष दिली पिडीतीने अल्पवयीन असुन न्यायालयात सवीस्तर घटना सागीतली या खटल्यात सरकार पक्षाला वर्षा सुतार ,पोलीस उपनिरिक्षक गोरख कसपटे ,साह्यक फोजदार नामदेव नलावडे यानी सहकार्य केले ,

