मुकनायक प्रतिनीधी
प्रशांत सोनंवणे
बारामतीत कोयता गॅग नंतर पिसतु्ल गॅगची हवा आसल्याची काही घडुन गेलेल्या घटना व नुकत्याच घडलेल्या घटनेवरुन दिसत आहे ,नुकताच बारामती पाटस रोडवरील कुर्ष्णा पेट्रोलपंपाच्या व्यस्थापकाला सोमवारी भर दुपारी लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला पिस्तूलचा धाक दाखवत ते पेट्रोलपंपावरील रक्कम बॅकेत भरण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला या घटनेत पंपाचे व्यस्थापक मयुर शिदे (३२ ) हे गंभीर जखमी झाले परतु त्यानी निकराचा प्रतिकार केल्याने दोघा चोरट्याना ही रोकड न घेताच पसार व्हावे लागले ,सोमवारी सकाळी साडे आकरावाजता
नेहमी प्रमाणे शिदे यानी पेट्रोलपंपावरील रक्कम घेतली ती भरण्यासाठी दुचाकीवरुन शहराच्या दिशेने येत होते या वेळी स्प्लेडर दुचाकीवरुन आलेल्या दोघानी पिस्तुलचा धाक दाखवला त्याच्या कडील रक्कम असणारी बॅग हिसका मारुन पळविण्याचा प्रयत्न केला परतु शिदे यानी ही बॅग पोटाखाली दाबुन ठेवली बॅग हाती मिळत नसल्याचे लक्षात आल्याने त्यानी काही अंतरापर्यत फरपटत नेहण्यात आले तरीही शिदे यानी आपली चिकाटी सोडली नाही चोरट्याना बॅग मिळु नये म्हणुन जीवाचे रान केले या घटनेत चोरट्यानी मयुर शिदे याना जबर मारहाण केल त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत त्याना उपचारासाठी सिल्व्हर ज्युबली उपजिल्हा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे त्याना पाच ते सहा टाके पडले आहेत या घटनेचा तपास बारामती शहर पोलीसान कडुन तपास केला जात आहे,

