Thursday, February 26, 2026
Homeपिंपरी-चिंचवडपत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत चालले आहेत. ही गोष्ट महाराष्ट्राला आभिमानाची नाही.. बापूसाहेब...

पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत चालले आहेत. ही गोष्ट महाराष्ट्राला आभिमानाची नाही.. बापूसाहेब गोरे

वरिष्ठ प्रतिनिधी मूकनायक लक्ष्मण रोकडे पिंपरी चिंचवड.

दि. १४ ऑगस्ट २०२३ जळगाव जिल्ह्यातील लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन हे आपले कर्तव्य बजावत असताना दोन दिवसांन पूर्वी त्यांच्यावर आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. पत्रकार संदीप महाजन हे निर्भिड आणि निःपक्ष पत्रकार म्हणून त्यांची पाचोर्‍यात ओळख आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी पाचोरा येथील एका घटनेची निर्भिड पणे वाच्यता केली होती त्यावेळी स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी त्यांना फोनद्वारे धमकी दिली होती. दोन दिवसांन पूर्वी त्यांच्या स्थानिक गावं गुंडांनी पत्रकार महाजन यांना मारहाण केली व त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
केला.
या घटनेचा पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ व डिजिटल मीडिया संघ यांच्यावतीने तीव्र निषेध करीत असून आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका इमारतीमधील पत्रकार कक्षात आज सायंकाळी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ व डिजिटल मीडिया संघाची पत्रकार संदीप महाजन त्यांच्यावर झालेल्या
हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध सभेचे आयोजन केले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आमदार व त्यांच्या मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी,
अशीही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी व इतर पदाधिकारी व सदस्य यांनी प्रतिपादन केले आहे.
यावेळी पत्रकार संघाचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “महाराष्ट्रातील पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत चालले आहेत. ही गोष्ट महाराष्ट्राला आभिमानाची नाही”. त्यामुळे शासनाने पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात येणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे होते. बैठकीस पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव उपाध्यक्ष गणेश शिंदे, संतोष जराड, युनूस खतीब, डिजीटल मिडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष भिमराव तुरूकमारे, समन्वयक लक्ष्मण रोकडे, सचिव प्रसाद बोरसे, खजिनदार मुकेश जाधव, उपाध्यक्ष शफिक शेख, उपाध्यक्ष यशवंत गायकवाड, विनोद शिंदे, अनिता बिराजदार, माणिक पौळ इत्यादी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments