Thursday, February 26, 2026
Homeनांदेड*नावालाच अधिकारी होण्यापेक्षा आंबेडकरवादी विचारांचा अधिकारी होऊन सामाजिक बांधिलकी जोपासणे, ही काळाची...

*नावालाच अधिकारी होण्यापेक्षा आंबेडकरवादी विचारांचा अधिकारी होऊन सामाजिक बांधिलकी जोपासणे, ही काळाची गरज.* — मा. दिपक कदम, संचालक आंबेडकरवादी मिशन

नांदेड —

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, शिक्षित होऊन माऱ्याच्या व मोक्याच्या जागा तरुणांनी काबीज कराव्यात, असा मूलमंत्र दिलेला होता. तीच वैचारिक प्रेरणा मनात रुजवून शास्त्रज्ञ क्रांती प्रकाश येवले ह्या उच्च शिक्षणासाठी शिकागोला जात आहेत, त्यांनी जागतिक पातळीवरील 10 व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या शिकागो येथील इलनॉय युनिव्हर्सिटीत आपल्या बुद्धी कौशल्याने मास्टर्स डिग्रीसाठी प्रवेश मिळविलेला आहे, असे गौरवोद्गारपर अभिष्टचिंतन करुन पुढे बोलताना ते म्हणाले की, तरुणांनी नुसतं नावालाच अधिकारी होण्यापेक्षा आंबेडकरवादी विचारांचा अधिकारी होऊन सामाजिक बांधिलकी जोपासणे ही काळाची गरज आहे, असे आग्रही प्रतिपादन आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख संचालक मा. दीपक कदम यांनी केले.
शास्त्रज्ञ क्रांती प्रकाश येवले यांचा अमेरिकेच्या शिकागो येथील इलनॉय युनिव्हर्सिटीत “व्यवसाय विश्लेषणात्मक विज्ञान” या विषयाच्या मास्टर्स डिग्रीसाठी प्रवेश निश्चित झाला. त्यानिमित्ताने त्यांचे स्वागत व अभिनंदन सोहळ्याचे आयोजन प्रज्ञा करुणा विहार समिती नांदेडच्या वतीने प्रज्ञा करुणा विहार देगांवचाळ नांदेड येथे नुकतेच करण्यात आले होते. यावेळी प्रथमतः तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण आणि अभिवादन केल्यानंतर आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन झंझावात तथा महाराष्ट्र शासन पुरस्कृत मुख्यमंत्री वसंतराव नाईक समाज भूषण ॲड. मा. मा. येवले यांचा आशीर्वाद घेऊन सामुदायिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.रमेश सोनाळे हे होते. तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी.यु. गवई सर, स्वा.रा. तिर्थ मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख शास्त्रज्ञ प्रा. डॉ. भास्कर दवणे सर, बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.सुखदेव चिखलीकर, रिपाइं (ए)चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. विजयदादा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री मा. साहेबराव पुंडगे, मा. राहुलभाऊ वाघमारे, मा. सुभाषदादा काटकांबळे, राजू कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे माजी उपआयुक्त मा. प्रकाश मा. येवले यांनी केले. ते आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, कु. क्रांतीचे मातृछत्र वयाच्या अडिचव्या वर्षी हरपले. सौ भारतीचे निधन झाले. तिच्या आईला दोन्ही मुलींना खूप शिकवायचे होते. तिची ईच्छा पुर्ण करण्यासाठी क्रांतीची मानसिकता तयार करताना तिला आकाशातील चंद्र तारे दाखवून तेथपर्यंत जायचे असेल तर शिकावे लागेल असे इयत्ता 5 वी पर्यंत दररोज तिला झोपू घालताना सांगून तिची मानसिक तयारी केली. महाडच्या चवदार तळ्याचे जवळील रायगड मिलिटरी स्कूल मधे इयत्ता 6 वी 7 वीचे शिक्षण झाल्यावर इयत्ता 8 वी पासून पुढील शिक्षण कोटा, राजस्थान आणि आयआयटी कानपूर येथे झाले. हे शिक्षण घेत असताना मागासवर्गीयांचा शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ तिला घेऊ दिला नाही आणि तीने सुद्धा तसा अर्ज केला नाही. या सुरेख कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध आंबेडकरी गायक क्रांतीकुमार पंडित यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगवान येवले, गौतम येवले , राष्ट्रपाल येवले, महेंद्र येवले, वसंत हाटकर आणि सुभाष लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शास्त्रज्ञ कु क्रांती येवले हिचे अभिष्टचिंतन करुन आशिर्वाद देण्यासाठी पी.सी. येवले (आजोबा), नामदेव थोरात, अशोक पंडित, डॉ. रंगनाथ नवघडे, माणिक हिंगोले, ॲड माणिक नरवाडे, इंजि. देवानंद निखाते, बालाजी पवार पालम, किशनराव गवळी जैतापूर, सत्यानंद शिवरात्री, आनंद गोडबोले बेटसावंगी, सुधाकर येवले, मुंजाजी नरवाडे, केरबाजी नवरे, बाळू सातोरे, राजू गोडबोले, रंगनाथ कांबळे, स्वामी चेपूरी, राजू गच्चे, माधव गायकवाड, संघरत्न नवघडे, भीमराव थोरात, व्यंकटी नवरे, रवी गोडबोले, हरिष नवघडे, दिलिप गोडबोले, महंमद शकील, सुनील गोडबोले, नागराज नवघडे, भिमाबाई हाटकर, निर्मलाबाई पंडित, शकुंतला सोनुले, गयाबाई हाटकर, सविता नांदेडकर, गुजाबाई खाडे, शांताबाई खाडे, चौत्राबाई चिंतोरे, सुमनबाई वाघमारे, शिल्पा लोखंडे, सुनीता नवघडे, कल्पना ढेपे, प्रभावती हाटकर, गोदावरी लांडगे, किसनाबाई हाटकर, जयश्री राजभोज हे आवर्जून उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments