Thursday, February 26, 2026
Homeदौंडदौंड पोलिस स्टेशन मध्ये माजी सैनिकांनचा व पॅंथर जयदीप बगाडे RTI कार्यकर्ते...

दौंड पोलिस स्टेशन मध्ये माजी सैनिकांनचा व पॅंथर जयदीप बगाडे RTI कार्यकर्ते यांचा केला सत्कार.

दौंड मूकनायक प्रतिनिधी: विजय बगाडे

दौंड- मेरी माटी मेरा देश या अभियाना अंतर्गत दौंड शहर आणि तालुक्यातील माजी सैनिक हनुमंत लांडगे, अनिल जयवंत खणसे, दत्तात्रय बी.पवार, सूर्यवंशी, होले,बंडकर, शेंडगे, लोंढे व इतर माजी सैनिकांनचा केला दौंड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी सत्कार. माजी सैनिकांनी केलेल्या देश सेवे बदल केले कौतुक. माजी सैनिकांनचा सत्कार झाल्या नतंर पोलिस स्टेशन मध्ये माजी सैनिकांन च्या जमीनी च्या सर्व मंजूरी मिळून फक्त चलन बनवण्या साठी गेली पाच वर्षे संघर्ष करून न्याय मिळाला नाही त्या साठी पॅथर जयदीप बगाडे RTI कार्यकर्ते यांनी आंदोलन उभारून दौंड शहरातील व तालुक्यातील माजी सैनिकांना न्यायसाठी आझाद मैदानावर माजी सैनिक यांच्या सोबत उपोषणाला आकरा दिवस बसून महाराष्ट्र शासनास दखल घेण्यास भाग पाडले. यासाठी माजी सैनिकांनी दौंड पोलिस स्टेशन मध्येच श्री.पॅथर जयदीप माणिक बगाडे यांनचा पुष्प गुच्छ व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारीता खंड देऊन सन्मान व सत्कार केला. हे पाहून पॅथर जयदीप बगाडे भावणीक होऊन बोलले. संपुर्ण देशात मेरी मीटी मेरा देश या अंतर्गत माजी सैनिकांनचा सन्मान होत आहे. पण आज त्याच माजी सैनिकांनी माझा सन्मान केला. ही माझ्या साठी अभिमान आणि गरवाची बाब आहे. हि माझ्या जिवनातील न भूतो न भविष्यती असा प्रसंग आहे. मी व माझा परीवार कधीच विसरू शकणार नाही. धन्यवाद व आभार सर्व माजी सैनिकांनचे मी माझे भाग्य समजतो की मी तुमच्या साठी छोटी लढाई लढत आहे. तूम्ही तर देशा साठी लढत आहात. सलाम तूम्हाला व तुमच्या कार्याला.
जय हिंद, जयभीम, जय संविधान, जय भारत पॅंथर जयदीप बगाडे Rti कार्यकर्ते यांनी अशी प्रतिक्रिय व्यक्त केली

- Advertisment -

Most Popular

Recent Comments