मुकनायक प्रतिनीधी
प्रशांत सोनवणे
सातारा दि. १६ डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर केंद्र व राज्य सरकारला चले जाव आंदोलनाच्या माध्यमातुन इशारा दिला आहे ,
सातारा जिल्हा अध्यक्ष ऋशिकेश गायकवाड म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळुण ७६ वर्ष झाली तरी दलिताचे जगणे मुश्किल झाले आहे ,महापुराषाच्या नावाचा आवमान केला जात आहे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या नावाच्या कमानी जमीनदोस्त होत आहे ,विविध प्रश्नाची आठवण करुन देण्यासाठी हे चले जाव आंदोलन करण्यात आले त्या वेळी संघटनेच्या महिला आघाडी सातारा जिल्हा अध्यक्षा वैशाली वायंदडे ,सरिता आवळे ,राजवीर सकट ,अनिकेत खवळे,शुभंम जाधव,राज चांदणे , सोमनाथ भिसे,दादासाहेब खवळे याच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

