मुकनायक प्रतिनीधी
प्रशांत सोनवणे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोल्हापुर दि २५ , रिपब्लिकन सेना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ जिल्हा सचिव मा.कृष्णात दावणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कळंबा येथे रिपब्लिकन सेना शाखा उद्घाटन करण्यात आले.तसेच मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.
*जिल्हयात कोल्हापूर अनेक पक्ष संघटना आहेत.कार्यरत आहेत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाभिमानी विचारधारा घेऊन रिपब्लिकन सेना काम करीत आहे. संपूर्ण जिल्ह्यात रिपब्लिकन सेना गतिमान करणार असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा.अर्जून कांबळे (दादा) यांनी व्यक्त केले.गाव तिथे शाखा बांधून सेना पाया मजबूत करुन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकद निर्माण करून सत्तेत स्थान मिळवू. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ जिल्हाध्यक्ष मा. अमोल कांबळे यांची उपस्थिती होती.*
*यावेळी प्रमूख उपस्थिती जिल्हा सचिव मा.सागर कुरडे, जिल्हा संपर्क मा.शुभम कामत,करवीर तालुका उपाध्यक्ष मा.विश्वनाथ भोसले,युवा करवीर उपाध्यक्ष मा.अभिजित कांबळे,युवा करवीर प्रसिद्धी प्रमूख मा. किरण कांबळे, युवा करवीर संपर्क प्रमूख मा.उदय गेंजगे याच्यासह पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्त उपस्थित होते.

