मुकनायक प्रतिनीधी
प्रशांत सोनवणे
बारामती शहरातील काळे प्रेस्टिजच्या इमारतीमध्ये गाळे खरेदी केले होते त्याची माहिती खालील प्रमाणे बारामती नगरपरिषदाचे हद्दीतील सर्वे नंबर ६/३/फ ६/३/ई पैकी मंजुरा ले आऊट नुसार बिगर शेती प्लॉट यांचे एकत्रित क्षेत्र १७६३,४७ चौ. मी यामध्ये आर सी सी फेरम ट्रॅक्टरमध्ये बांधलेल्या काळे प्रेस्टीज या इमारतीमधील दुकान गाळा नंबर ४१ क्षेत्र १२१,४६ चौक फुट मिळकतीचे खरेदीची किंमत रक्कम ११,६६००० इतके ठरली होती
सदरहू व्यवहारापोटी त्यांनी साठीखत
२०१४ चालेल करून दिले होते व त्यावेळी आम्हाला सांगितले की २०१५ पर्यंत संपूर्ण बांधकाम करून नगरपरिषद बारामती ना हरकत प्रमाणपत्र देऊन तसेच बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र देऊन तुम्हाला सर्व गाळेधारकांना सोसायटी करून तुमच्या ताब्यात दिले जाईल अशा प्रकारे आम्हास विश्वासात घेतल्याने व आम्हाला २०१९ साली सुनील दत्तात्रय मदने यांनी खरेदी दस्त नंबर १८ ६५ /२९ १९ अन्वये दस्त दिल्याने आम्ही व्यवहारात ची सर्व रक्कम रुपये ११ लाख ६६ हजार दिलेली होती व आहे
परंतु ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे सर्व रक्कम देऊनही व वारंवार विनंती करून देखील सुनील दत्तात्रय मदने व नितीन मारुतीराव काळे यांना सांगूनही आज दहा वर्ष झाले आम्हाला नगरपरिषद बारामती ना हरकत प्रमाणपत्र व बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही त्यामुळे आम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राचे वारंवार जप्ती ताब्याचे नोटीस येत आहे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून नितीन मारुतीराव काळे व सुनील दत्तात्रय मदने यांनी जे प्रोजेक्ट लोन काढले होते ते त्यांनी भरले नाही त्यामुळे सदर मिळकतीवर बँक ऑफ महाराष्ट्र व इतर बँकेचे सुद्धा कर्ज आहे व सार्वजनिक जागेवर अतिक्रमण व आम्हाला सांगितलं प्रमाणे कॅप्सूल लिफ्टच्या जागी साधी लिफ्ट बसवण्यात येत आहे त्याजागी टफन ग्लास न लावता साधी पाच एम एम ची काच बसविण्यात आली होती व निष्कृष्ट दर्जाचे काम व आम्हाला जे प्रोजेक्ट डिझाईन प्रमाणे सांगितले होते तसे काम करून दिले नाही व फायर कनेक्शन ही दिले नाही त्यामुळे इतर गाळेधारकांना व आम्हा सर्वांना जीवाला धोका आहे याप्रमाणे अनेक त्रुटी असताना आम्हाला समजले आहे की काळे प्रेस्टिज या इमारतीवर व आनखीन दोन मजले बांधकामाची परवानगी बिल्डरला मिळाली आहे परंतु हे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे आहे व दहा वर्ष जुने आहे त्यामुळे आम्हा सर्व गाळेधारक याबाबत सहमत नाहीत परमिट रूम दारूचे धंदे व लॉज असे प्रकारचे धंदे चालू करण्याच्या तयारीत असल्याचे आम्हास खात्रीशीर समजले आहे तरी काळे प्रेस्टिज या ठिकाणी अवैध धंदे करण्यास आमचा सर्वांचा विरोध असून सार्वजनिक पार्किंग पण विक्री करण्याच्या तयारीत होते पण आमच्या सर्व गाळेधारकांचा विरोध असून वारंवार सांगुनही त्यांनी अजुनही पार्किंग चालू केली नाही यामुळे आमची खुप मोठी फसवणूक झाली आहे
तरी आम्हाला आमच्या अर्जाचा सहानुभुती पुर्वक विचार करावा व सदर वरील विषयी सखोल चौकशी करून आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा अन्यथा आम्ही बारामती शहर पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन करु असा इशारा या निवेदनातुन दिला आहे,
दि १४/८/२०२३रोजी मा प्रांतधिकारी साहेब ,मा तहसिलदार साहेब ,मा उपविभागिय पोलीस अधिकारी साहेब याना दिलेल्या निवेदन काळे प्रेस्टीज मधील गाळे धारकानी मागणी केली आहे निवेदन देणारे गाळे धारक खालील प्रमाणे
१) आदिनाथ विठ्ठल खरात
राम काझड ता इंदापूर जिल्हा पुणे
२) हैदर अब्दुल तांबोळी
रा .मू .पो माळेगाव रोड म्हसोबा मंदिरा शितोळे वस्ती बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे
३) सौ संगीता नागेश लोंढे
नागेश विष्णू लोंढे
दोन्ही .रा. नवले वाडा पान गल्ली गुणवडी रोड बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे
४) मंगल शंकर कुंभार
रा. मू .पो करावागज तालुका बारामती जिल्हा पुणे
५) विजय मारुती जाधव
रा .मु. पो गुणवडी तालुका बारामती जिल्हा पुणे

