मूकनायक न्यूज नेटवर्क
(मूकनायक प्रतिनिधी.गणेश मच्छिंद्र भोसले )
पुणे : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस स मराठी त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हिtचितक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होडींग, जाहिरातींवर खर्च न करतातो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते याच भूमिकेवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अजित दादा पवार यांच्या मुंबई मध्ये मंत्रालय कार्यालयामध्ये जाऊन ६५ हजार रुपये मदत निधीचा चेक गरजूंनसाठी देण्यात आला.यावेळी आमदार सुनील टिंगरे, मा.नगरसेवक बाळासाहेब बोडके. दयानंद इरकल , विनोद ओरसे, मिलिंद वालवडकर , बाळासाहेब चव्हाण , आदी कार्यकर्ते उपस्थित होते

