सोलापूर येथे ३ ऑगस्ट दुपारी बारा वाजता रेस्ट हाउस
(विश्राम गृह) महारष्ट्र पातळीवर सर्व जुने नवे दलित पँथरचे नेते कार्यकर्ते यांची मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे या मीटिंगमध्ये आपण सर्वजण दलित पॅंथरची पुनर्बांधणी करणार आहोत जनतेतून याबाबत खूप मोठी मागणी आहे देशभरात खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार वाढलेले आहेत जातीयवादी मनुवादी शक्ती सत्तेवर आहेत ते आता हिंदू राष्ट्र निर्मितीचा प्रयत्न करीत आहेत त्यांना हिंदू राष्ट्र घोषित करावयाचे आहे हे आपण होऊ देता कामा नये हिंदुराष्ट्र निर्माण झाल्यास आपली पूर्वीची अस्पृश्य तेची समाज व्यवस्था निर्माण करायची आहे पुन्हा आपण गुलाम होणार आहोत असे आजची ही चित्र आपणास रोज पाहावयास व ऐकावयास मिळत आहे म्हणून पुन्हा दलित पॅंथर ची शक्ती निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून दिनांक 28 जुलै 2023 रोजी प्रति शाहू महाराज म्हणजे शिवश्री फत्तेसिंह राजे भोसले कोल्हापूर यांचे संमतीने त्यांची प्रमुख निमंत्रक महाराष्ट्र राज्य म्हणून अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व मान्यतेने निवड व नियुक्ती झालेली आहे दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता त्यानी आपले सर्व पॅंथरची महाराष्ट्र पातळीवरील बैठक आयोजित केलेली आहे यामध्ये महत्त्वाचे निर्णय होणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे कळविण्यात येत आहे
शिवश्री फत्तेसिंह राजे
भोसले
प्रमुख निमंत्रक महाराष्ट्र राज्य दलित पँथर

