Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रसातारा : फलटण येथे जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची डेमोक्रॅटिक पार्टी...

सातारा : फलटण येथे जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची पोलिस अधीक्षकांन कडे निवेदनाद्वारे केली मागणी,

मुकनायक प्रतिनिधी प्रशांत सोनवणे

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील गोकळी येथील , मारुती हरिहर यांनी दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी सर्व लोकांना पाच हजार रुपये प्रमाणे सर्वांना ॲडव्हान्स देऊन पवारवाडी येथे झाडी तोडुन कोळसा करण्यासाठी २०००० हजार रुपये टन प्रमाणे कोळसा करण्याकरिता मंजूरी ठरविण्यात आली व चार महिन्यांमध्ये अंदाजे ४० टन कोळसा त्यांनी दिला त्यांनी कसल्याही प्रकारची मंजुरी दिली नाही व पैसे मागितले की तुम्ही घरी जातेवेळी देतोअशी उडवाउडवीची उत्तरे देत राहिले व प्रत्येक रविवारी महिलांना लज्जास्पद शिवीगाळ करत आहे म्हणून त्यांच्या जाचाला कंटाळून प्रभाकर मोरे व गंगाराम काटकर, बडु जानु हिमल अशी दोन जोडपी गावी निघून गेली म्हणून या गोष्टीचा मनात राग धरुन सखाराम विष्णू मोरे यांची दोन चाकी हिरो होंडा गाडी एम एच १२ ,७३१६ हि गाडी लपवून ठेवली आहे व ती गाडी मागण्या करीता सखाराम विष्णू मोरे , अंकुश रामा जाधव गेले होते तेव्हा त्यांना काटकर्यानो भिकाररडयानो तुमची गाडी देणार नाही व जातीवाचक शिवीगाळ करून हाणमार केली व निघून गेला तरी मारुती हरिहर याला वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अवैद कलमा नुसार व ॲट्रॉसिटी ॲक्ट व ३५४ प्रमाणे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहेत्यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादाराम खवळे, अमोल इंगळे सातारा जिल्हा उपाध्यक्ष, ऋषिकेश गायकवाड सातारा जिल्हा युवा अध्यक्ष, आप्पासाहेब मिसाळ फलटण तालुका अध्यक्ष यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

- Advertisment -

Most Popular

Recent Comments