मुकनायक प्रतिनिधी प्रशांत सोनवणे
इंदापूर,दि ६ महावितरण च्या गलथान कारभारामुळे इंदापूर शहरातील दर्गा मज्जिद चौकातील विजेच्या खांबाला चिटकवून एका पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचीही घटना गुरुवारी ( दि ६ ) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली कुलसुम हैदर मुशाहीदी (वय ५ ) असे मृत्यू झालेल्या निष्पाप चिमुकलीचे नाव आहेया घटनेला महावितरणचे अधिकारी जबाबदार आहेत त्यामुळे त्यांच्यवर मुलींच्या मृत्यूवास कारणीभुत असल्याचा गुन्हा दाखल व्हावा याकरिता इंदापूर पोलिस ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांनी व शहरातील नागरिकांनी रात्री उशिरा पर्यंत गर्दी केली होती या बाबत साहयक अभियंता पी सी जाधव यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही दर्गा मज्जिद चौकात असणाऱ्या विघुत रोहित्राकडे महावितरणचे दुर्लक्ष आहे ,या ठिकाणी अनेक वेळा छोटे मोठे अपघात घडले आहेत , त्यामुळे महावितरण व नगर परिषद प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्वस्तक विवेकबुद्धी जागृत ठेवून उपाय योजना कराव्यात व मयत कुलसुमला न्याय मिळावा अशी मागणी इंदापूर शहरातील नागरिकांनी केली आहे

