प्रतिनिधी प्रशांत सोनवणे
मौजे वडापूर तालुका दक्षिण सोलापूर या गावी गेली २५ ते ३० वर्षा पासून सरकारी जमिनीवर कच्ची घरे बांधून राहत असलेल्या नागरिकांना प्रधानमंत्री घरकुल लाभार्थी योजनेचा लाभ मिळण्यासाठी वडापुर येथील घरकुल लाभार्थी व रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा कार्यकारिणी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे धरणे आंदोलन केले असता त्या आंदोलनाला यश मिळाले आहे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब उपविभागीय अधिकारी साहेब सोलापूर क्रमांक ( २ ) वडापूर येथील प्रधानमंत्री घरकुल लाभार्थी ज्या जागेवर राहतात ती जागा पंडित दीनदयाळ उपाध्याय जमीन खरेदी योजना अंतर्गत विनामूल्य देऊन त्या ठिकाणी प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ वडापूर येथील घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावा असे पत्र मंद्रूप येथील अप्पर तहसीलदार व दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रभारी तहसीलदार श्री राजशेखर लिंबारे साहेब यांना देण्यात आले पुढील काळात वडापूर घरकुल लाभार्थी यांना याद्वारे न्याय मिळणार याची खात्री झालेली आहे रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा महासचिव मा कांबळे साहेब असे म्हणाले अध्यक्ष ऍड हर्षवर्धन शिंदे सोलापूर जिल्हा महासचिव सिद्धार्थ कांबळे जिल्हा उपाध्यक्ष मानताप्पा सिताफळे जिल्हा उपाध्यक्ष भागवत गायकवाड शहर उपाध्यक्ष वसीम पठाण उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब मसल खांब रिपब्लिकन सेना वडापूर ग्राम शाखा अध्यक्ष अरुण कांबळे ग्रामपंचायत सदस्य बायडा सिद्धार्थ कांबळे इत्यादी कार्यकर्ते व घरकुल लाभार्थ्यांती उपस्थित होते

