मूकनायक न्यूज नेटवर्क
(मूकनायक प्रतिनिधी.गणेश मच्छिंद्र भोसले )
कुर्डुवाडी येथील डबे बनविण्याचा कारखाना इतरत्र हालवू नये, तो पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी उपाययोजना करावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे याचा पाठपुरावा करावा यासाठी आ. महादेव जानकर साहेब यांनी आज विधीमंडळात विषय उपस्थित केला.
माढा तालुक्यातील कुर्डू, पिंपळखुंटे, पडसाळी,सोलंकरवाडी, बावी,रोपळे, उपळाई, अंजनगाव, तुळशीसह तालुक्यातील जि गावे सिना माढा उपसा सिंचन योजनेतून शेतीच्या पाण्यापासून वंचित राहिली आहेत त्या गावाना पाणी मिळण्याची व्यवस्था झाली पाहिजे.हि मागणी आमदार महादेव जानकर साहेब यांनी आज विधीमंडळात मांडली, त्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी माढा तालुक्यातील जनतेच्या वतीने हार्दिक आभार मानले.

