Thursday, February 26, 2026
Homeदौंड*राजेगांव मध्ये मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबिर*

*राजेगांव मध्ये मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबिर*

मूकनायक न्यूज नेटवर्क
(मूकनायक प्रतिनिधी.गणेश मच्छिंद्र भोसले )

२५ जुलै २०२३ : राजेगांव ता .दौड

दिव्य समाज निर्माण संस्था आणि
स्वामी समर्थ हॉस्पिटल (आय.सी.यु.)
अॅण्ड मॅटर्निटी होम भिगवण यांच्या संयुक्त विद्यमाने राजेगांव मध्ये भव्य असे सर्व रोग निदान आरोग्य शिबिर घेण्यात आले .यावेळी राजेगांव आणि परीसरातील २४५ रुग्णांनी या शिबिरात सहभाग घेतला .
स्वामी समर्थ हॉस्पिटल च्या वतीने
मोफत मधूमेह व उच्च रक्तदाब ई.सी.जी तपासणी करण्यात आली .
सर्व रोग निदान तपासणी केल्यानंतर रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली .
बुधरानी हॉस्पिटल पुणे च्या वतीने मोफत मोतीबिंदू निदान व नेत्र तपासणी करण्यात आली . २९ रुग्णांना डोळ्यांच्या शस्त्रक्रियासाठी पात्र करण्यात आले ..
या शिबीरीमध्ये मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांची बुधराणी हॉस्पीटल पुणे येथे विना शुल्क शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
अत्यंत अल्प दराने चष्मे वाटप करण्यात आली .
आजपर्यंत या भागातील हजारो रूग्णांना या शिबिराचा लाभ मिळाला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना शहरी भागात जाता येत नसल्याने या शिबिरामुळे परिसरातील गोर गरीब रुग्णांची मोठी सोय झाली आहे .
दिव्य समाज निर्माण संस्था आविरत पणे या भागातील गोरगरीब तसेच आरोग्यापासुन वंचीत असलेल्या रूग्णांना दृष्टी देण्याचे व आरोग्यासाठी सहकार्य करीत आहे .
प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेला राजेगांव मध्ये दिव्य समाज निर्माण संस्था नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करीत आहे .
दिव्य समाज निर्माण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश शितोळे देशमुख यांनी या शिबिराचे आयोजन केले होते .
या शिबिरावेळी स्वामी समर्थ हॉस्पिटलचे डॉ. नितीन काळे , दौंड कृषी बाजार समितीचे संचालक भारत खराडे राजेश्वर विकास सेवा सोसायटी चे माजी चेअरमन अमोल मोरे , दौंड तालुका शिवसेना डॉक्टर सेलचे समन्वयक डॉक्टर प्रमोद रंधवे , वुधराणी हॉस्पिटलचे वैभव गाढवे ,राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कर्ते राजेंद्र कदम ,भरत मोरे
स्वामी समर्थ हॉस्पिटलचे प्रवीण बोर्डे ,दिलीप सुरवसे तसेच दिव्य समाज निर्माण संस्थेच्या सचिव सौ .सीमा शितोळे – देशमुख उपस्थित होत्या .

- Advertisment -

Most Popular

Recent Comments