वरिष्ठ प्रतिनिधी मूकनायक
यवत पोलीस स्टेशन मौजे राहु गावचे असणारे विजय उर्फ रामराव शहाजी सोनवणे यांचे म्हशीचे गोठयावरील कामगाराचा खुन झालेबाबत सुरेश बाबुराव सोनवणे वय ५५ वर्षे रा राहू ता. दौंड जि. पुणे यांनी फिर्याद दिली की, दिनांक २४/०७/२०२३ रोजी सकाळी ०९/३० वा चे सुमारास राहू येथील विजय उर्फ रामराव शहाजी सोनवणे यांचे म्हशीचे गोठ्याचे पाठीमागे असलेले विहिरीमध्ये एक इसम मृत अवस्थेत तरंगत आहे असे कळवल्याने फिर्यादी यांनी म्हशीचे गोठ्याचे पाठीमागे असलेले महादेव तुकाराम शिंगारे यांचे मालकीचे विहिरीमध्ये जाऊन पाहिले असता सदर विहिरीमध्ये एक इसम मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना दिसला सदर बाबत पोलीस स्टेशनला कळविले नंतर पोलिसांनी स्थानिक लोकांचे मदतीने सदरचे विहिरीतील प्रेत बाहेर काढले व त्याची पाहणी केली असता सदर मयताचे उजवे डोळ्याचे कपाळावर, डाव्या डोळ्याचे वरती कपाळावर उजवे बाजूचे हनुवटी जवळ जखमा झाल्याचे दिसत होते.
सदर मयत इसमा बाबत आजुबाजूचे लोकांकडे चौकशी केली असता सदर मयत इसमाचे नाव भिमकुमार अनिल यादव वय ३० वर्ष रा जयपुर तहसील मेहंदीया, जिल्हा आरवल राज्य बिहार, असे असल्याचे समजले असून सदर मयत हा विजय उर्फ रामराव शहाजी सोनवणे रा. राहु ता. दौंड जि. पुणे, सध्या सोमवार पेठ यांचे मालकीचे म्हशीचे गोवरील कामगार असल्याचे समजले असून त्यांना कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने वार करून खुन करून मृतदेह महादेव तुकाराम शिंगारे यांचे मालकीचे विहिरीमध्ये टाकून दिला आहे.
वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून यवत पोलीस स्टेशन गु. र.नं. ८६२ / २०२३ भा. द.वि. क.३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता..
सदर गुहाचे गांभीर्य पाहून मा. पोलीस अधीक्षक डॉ. अंकित गोयल पुणे ग्रामीण यांनी सदर गुहातील आरोपीचा शोध घेणेबाबत दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व पोलीस निरीक्षक श्री. हेमंत शेडगे, यवत पोलीस स्टेशन यांनी यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची वेगवेगळी ०३ तपास पथके तयार करून त्यांना तपासाचे अनुशंगाने योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या.
सदर पोलीस पथकानी गुन्हा घडले ठिकाणचे आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तसेच आजुबाजुचे परिसरातील लोकांकडे व गोठ्यावर काम करणारे इतर मजुर यांचेकडे सखोल चौकशी केली .
गोपनीय बातमीदार यांचेकडे विचारपुस करीत असताना यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा खून हा सोनवणे यांचे म्हशीचे गोठयावर काम करणारा इसम नामे भोला उर्फ जयप्रकाश जंगलाप्रसाद कुमार रा. आराहरा ता. वाराणसी, जि. बनारस, राज्य अस्देश याने केला आहे.
अशी माहीती मिळाल्याने सदर इसमास ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता. त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली असुन सदर आरोपीस दिनांक २९/०७/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे.
त्यास मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दौंड कोर्ट यांचे न्यायालयात हजर केले असून मा. न्यायालयाने त्यास ०४ दिवस पोलिस कस्टडी दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पो. स. ई. मदने हे करीत आहेत.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक श्री. आनंद भोईटे, यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग श्री. स्वप्निल जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन श्री. हेमंत शेडगे यांचे नेतृत्वाखाली सहा पोलीस निरीक्षक के. वाय. वाबळे, पोसई प्रशांत मदने, पो. हवा. निलेश कदम, पो.हवा गुरूनाथ गायकवाड, पो. हवा अक्षय यादव, पो.हवा. सचिन घाडगे, स्था. गु. शाखा, पो. हवा. अजित भुजबळ स्था. गु. शाखा, पो. हवा. रामदास जगताप, पो. हवा. चांदणे पो.ना. अजित काळे, पो.ना. अमित यादव, पो. कॉ. मारूती बाराते यांचे पथकाने केली आहे.

