दौंड मूकनायक प्रतिनिधी : विजय बगाडे
माजी सैनिक मागासवर्गीयवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आझाद मैदान मंत्रालय मुंबई आमरण उपोषण. नियोजित माजी सैनिक मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित दौंड यांच्या जागा मागणीचे प्रकरण मंजुरीसाठी मंत्रालयात पाच वर्षापासून प्रलंबित असल्याचे निषेधार्थ आमरण (प्राणांतिक) तसेच मणिपूर मधील माझे सैनिक यांच्या पत्नीवर केलेल्या भ्याड हल्ल्याची व विवस्त्रावस्तेत काढण्यात आलेली धींड याच्या निषेधार्थ दौंड तालुका माजी सैनिक सहकारी गृह रचना संस्था मर्यादित दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे यांना शासनाने दौंड शहरातील महसूल खात्याची गट नंबर ९२/ब मधील 45 आर ही जागा दिनांक ३१/८/२००९ रोजी ३६ माजी सैनिकांना दिली आहे (२) पैरा नंबर १ मधील जागा मागणीच्या प्रकरण मधुन आम्हा मागासवर्गीयांना वकळले आहे त्यामुळे आम्ही माजी सैनिक, शहीद विधवा, अपंग सैनिक यांनी गट नंबर ९२/ब मधील 0 हे ४० आर नियोजित माजी सैनिक मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित दौंड यांनी जागा मागणी शासनाकडे केली आहे प्रस्तावाची पूर्तता तयार करून मा. जिल्हाधिकारी पुणे यांनी मा. विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे जागेचा प्रस्ताव पाठविला आहे तो प्रस्ताव मा.डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त, पुणे पुणे विभाग पुणे यांनी जावक क्रमांक मह/२/जमीन पुणे/जमीन मागणी/सी.आर./३५/२०१६ दिनांक १४/१२/२०१८ रोजी मा. अपर मुख्य सचिव महसूल नोंदणी व मुद्रांका शुल्क मंत्रालय मुंबई ३२ यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे तेव्हा पासून सदरील प्रस्ताव महसूल खात्याकडे सुमारे पाच वर्षापासून प्रलंबित आहे (३) जागा मंजूरीचे विंलंबाचे निषेधार्थ (१) श्री हनुमान बन्सीलराम लांडगे वय ६८ वर्षे (२) श्री अनिल जयवंत खणसे वय ७३ वर्षे (३) श्री. तुकाराम बबन सूर्यवंशी, वय -५२ वर्षे (४) श्री. जयदीप माणिक बगाडे, आर.टी.आय. कार्यकर्ते, (५) श्री.हनुमंता कोपनर वय -५२ वर्षे असे आम्ही वरील विषयात नमुद केल्या प्रमाणे व मनिपुर मध्ये झालेल्या अत्याचारबद्दल देशभरात संतांपाची असलेली लाट याबाबत येथील राज्य सरकार महिला आयोग्य व इतर जो कोणी सदरच्या प्रकरणात सामिल असेल त्याला कडक शासन व्हावे तसेच मणिपूरच्या मंत्र्यांच्या पत्नी किंवा मुलीवर असा प्रसंग घडला असता तर तेथील गृहमंत्र्यांनी कोणती भूमिका घेतली असती या प्रकरणाबाबत राज्याची मंत्री व देशाची पंतप्रधान गप्प का? या प्रकाराबद्दल आमची सहकारी गृहरचना संस्था निषेधार्थ उपोषण करत आहे असे निषेधार्थ माजी सैनिकांनी यांनी सांगितले निषेधार्थ आमरण उपोषणाचे ठिकाण आझाद मैदान मुंबई शुक्रवार दिनांक ११/०८/२०२३ सकाळी अकरा वाजता पासून अंतिम निर्णया होई पर्यंत असे निवेदन मा. दौंड पोलीस निरीक्षक सो, दौंड पोलीस स्टेशन दौंड यांना देण्यात आले. माजी सैनिकांचे नावे खालील प्रमाणे.
१) हनुमंता बं लांडगे.
२) दिलीप सोपानराव वाघमोडे.
३) जठार सूर्यकांत मारूती. ४) कांतीलाल बबन सोनवणे.
५) रामदास हरी पालवे.
६) नंदाराम विठ्ठल भंडारी.
७) राजेंद्र रामचंद्र लोणकर.
८) अरुण शंकर काळे. ९) साहेबराव एकनाथ चव्हाण.
१०) गंगाराम महादेव बनकर. ११) अर्यना गंगाराम बनकर. १२) सजाबाई पंढरीनाथ भागवत.
१३) अनिल जयवंत खणसे.
१४) शहीद विधवा सुष्मित्रा अरुण पालेकर

