मुकनायक प्रतिनिधी
प्रशांत सोनवणे
भारतीय जनता पार्टी, शिवसेना युतीच्या सरकारमध्ये येण्याचा अजित पवार यांचा निर्णय स्वागतार्ह आहे त्यामुळे आगामी २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातुन भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीचे ४५ प्लस खासदार निवडून येऊन नरेंद्रजी मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान होणार आहेत , तसेच लोकसभा व विधानसभा जागेच्या उमेदवारीचा निर्णय भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्व घेईल अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील साहेब यांनी रविवारी दि ९ जुलै रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली इंदापूर येथे अर्बन बँकेच्या सभागृहात तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा संपन्न झाला तसेच या प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांची पत्रकार परिषद झाली , सदर प्रसंगी पाटील बोलत होतेमहाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी शिवसेना युती मध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार अधीक गतिमान होणार आहे , इंदापूर तालुक्यातील विकास कामांना भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती कडुन निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही या वेळी पाटील यांनी दिली ,या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,अशिश शेलार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आदी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा झाल्या इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी साठी आगामी राजकीय भविष्य उज्ज्वल असणार आहे त्यामुळे कार्यकत्यांनी काळजी करण्याचे कारण नाही अस स्पष्ट मत पाटील यांनी व्यक्त केले.

