Thursday, February 26, 2026
Homeपुणेबारामती शहर पोलीस निरीक्षक पदी दिनेश सखाराम तायडे यांची पोलिस ठाण्यात नियुक्ती...

बारामती शहर पोलीस निरीक्षक पदी दिनेश सखाराम तायडे यांची पोलिस ठाण्यात नियुक्ती .!

गणेश मच्छिंद्र भोसले बारामती तालुका प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात दहा पोलिस निरीक्षक, 18 सहायक पोलिस निरीक्षक यांच्या बदल्यांचे व 11 नव्याने हजर झालेले पोलिस निरीक्षक, चार नव्याने हजर झालेले सहायक पोलिस निरीक्षक यांच्या नियुक्तीचे आदेश गुरुवारी (ता.13) रात्री पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिले. काही जणांना मनासारख्या जागा मिळाल्या, तर काहींना चांगले पोलिस ठाणे न मिळाल्याने त्यांच्यात अस्वस्थता आहे. त्यामुळे ‘थोडी खुशी थोडा गम’ असे वातावरण निर्माण झाले आहे. चांगले पोलिस ठाणे मिळावे म्हणून अनेक दिग्गजांनी राजकीय नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले होते.पोलिस निरीक्षक अधिकाऱ्याचे नाव व नियुक्तीचे ठिकाण : संजय जगताप – शिरूर पोलिस ठाणे, अण्णासाहेब घोलप- राजगड पोलिस ठाणे, उमेश तावसकर-नियंत्रण कक्ष, महेश ढवण- रांजणगाव पोलिस ठाणे, बळवंत मांडगे -मंचर पोलिस ठाणे, सचिन पाटील-नियंत्रण कक्ष, विलास भोसले- सुरक्षा शाखा, सतीश होडगर- आर्थिक गुन्हे शाखा, संतोष जाधव -सासवड पोलिस ठाणे, बापूसाहेब सांडभोर- जेजुरी पोलिस ठाणे, नव्याने हजर झालेल्या पोलिस निरीक्षक अधिकाऱ्याचे नाव व नियुक्तीचे ठिकाण :: बबन पठारे -नियंत्रण कक्ष, अण्णा पवार – आर्थिक गुन्हे शाखा, ललित वर्टीकर- नियंत्रण कक्ष, रवींद्र पाटील -कामशेत पोलिस ठाणे, कुमार कदम -वडगाव मावळ पोलिस ठाणे, दिनेश तायडे – बारामती शहर पोलिस ठाणे, सुभाष चव्हाण – नियंत्रण कक्ष, राजेश गवळी-पोलिस कल्याण शाखा, सूर्यकांत कोकणे – नियंत्रण कक्ष, सुहास जगताप – जिल्हा वाहतूक शाखा, शंकर पाटील – भोर पोलिस ठाणे .

- Advertisment -

Most Popular

Recent Comments