दौंड तालुका मूकनायक प्रतिनिधी: विजय बगाडे
फुले शाहू आंबेडकर व दलित मुस्लिम ख्रिश्चन व इतर पक्ष संघटनेच्या वतीने मणिपूर मध्ये घडलेल्या घटनेचा निषेधार्थ व दलित मुस्लिम ख्रिश्चन समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध दौंड मध्ये मूक मोर्चा काढण्यात आला मोर्चेची सुरुवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करून मोर्च्याची सुरुवात करण्यात आली संपूर्ण देशामध्ये सध्या दलित मुस्लिम व ख्रिश्चन या समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे याचा दौंड शहरात निषेध करण्यात आला तिन्ही समाजातील बांधवांनी मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते व महिलांची संख्या उपस्थित लक्षवेधी ठरली शहरातील दौंड पोलीस स्टेशन समोरील संविधान स्तंभ विविध मागणीचे निवेदन दौंड तहसीलदार यांना देण्यात आले या ठिकाणी झालेल्या निषेध सभेमध्ये तिन्ही समाजावर व मणिपूर येथे दोन बहिणीवर अन्याय अत्याचार केले त्यांची नग्न धिंड काढण्यात आली या घटनेत सामील समाजकंटकांना वर कठोर कारवाई करण्यात यावी मणिपूर घरे चर्च जाळण्यात आली आहेत त्याचे पुनर्वसन करण्यात यावी दलित मुस्लिम व ख्रिश्चन समाजावर होणारे अत्याचार थांबले पाहिजे काष्टी या ठिकाणी दोन-तीन महिन्यापूर्वी ख्रिश्चन समाजातील महिलांना प्रार्थनेसाठी गेले असताना अमानुष वागणूक मिळाली व मुस्लिम समाजवर लव जिहाद च्या नावाखाली मुस्लिम समाजवर होणारे अन्याय थांबवले पाहिजेत डॉ बाबासाहेबांच्या संविधानाने आम्हाला जगण्याचा अधिकार दिलेला असताना आम्हाला या ठिकाणी न्याय मिळत नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला निषेध सभेमध्ये भारत सरोदे अमित सोनवणे रतन जाधव नागसेन धेंडे अश्विन वाघमारे मतीन शेख पास्टर बेंजामिन तिवारी यांनी मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

