मुकनायक प्रतिनिधी बारामती शहर गणेश चव्हाण
बारामती शहरातील एस आय एज्युकेशन ट्रस्ट संचलित समीर वर्ल्ड स्कूल ,, हे बारामती निरा हा खुप वाहतुकीचा मार्ग असल्याने तेथे सतत मोठे ट्रक, तसेच लहान मोठी वाहने वाहतूक करत असतात तसेच त्या ठिकाणी कसलेही गतीरोधक नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच पालकांना रस्ता क्रॉस करणे धोकादायक ठरत आहे तसेच त्याठिकाणी अपघात होण्याची खुप दाट शक्यता आहे म्हणून रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने दि २३/५/२०२३ रोजी बारामती चे प्रांताधिकारी साहेब, तहसीलदार, बारामती नगर परिषद यांना निवेदन देण्यात आले होते परंतु दोन महिने होऊन गेले तरी प्रशासनाने समीर वर्ल्ड स्कूल च्या समोर गतीरोधक, पुढे शाळा आहे फलक अद्याप लावले नाहीत म्हणून रिपब्लिकन युवा सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा गणेश चव्हाण यांनी प्रशासनानं लवकरात लवकर गतीरोधक व रस्त्याच्या दोन्ही बाजूला पुढे शाळा आहे वाहाने सावकाश चालवा फलक लावण्यात यावा अशी मागणी केली आहे पुणे जिल्हा महासचिव मा प्रशांत सोनवणे, माजी पुणे जिल्हा अध्यक्ष मा तुषार गायकवाड उपस्थित होते ,

